Farmer Loan : स्टेट बँक शेतकऱ्यांना देते 3 लाख रुपये कर्ज! कसे ते वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Loan :- शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्ज वेळेवर मिळणे याला खूप महत्त्व आहे. कारण अगोदरच अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावते. त्यामुळे शेतीच्या पुढील हंगामाची तयारी करिता आणि कुटुंबा करीता देखील पैशांची निकड भासते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात पैसा उपलब्ध होतो.

परंतु बऱ्याचदा बँकेचा आडमुठेपणा यामध्ये नडतो आणि शेतकऱ्यांना वेळेवर पिककर्ज उपलब्ध होत नाही. या सगळ्या अनुषंगाने शासन देखील अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण काम करत असतं. याच पद्धतीचे मदत किंवा योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड होय. या केसीसीच्या मदतीने शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.

 एसबीआय किसान क्रेडिट कार्ड

शेतकरी स्वावलंबी व्हावेत व त्यांना शेतीमध्ये महत्त्वाची कामे वेळेत करता यावी याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा इतर कोणत्याही बँकेत खाते उघडून तीन लाख रुपयाचा लाभ घेता येऊ शकतो.या योजनेचा हेतू मुळात असा आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या शेती आणि इतर कामांकरिता बँकेच्या माध्यमातून कमीत कमी व्याजदरात कर्ज मिळवून देणे हा आहे.

शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरात आणि अगदी सोप्या पद्धतीने कर्ज मिळावे याकरिता किसान क्रेडिट कार्ड योजना राबवण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून शेतकरी जास्तीत जास्त सात टक्के व्याजदराने कर्ज घेऊ शकतात. जर शेतकऱ्यांनी घेतलेले कर्जाची परतफेड वेळेवर केली तर सरकार व्याजदरामध्ये तीन टक्क्यांची सूट देखील देते. म्हणजेच या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जावर केवळ चार टक्के व्याजदराने व्याज द्यावे लागते.

 किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

देशातील प्रत्येक शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ दिला जात आहे. या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी किमान 18 ते कमाल 75 वर्षे वयोमर्यादा असणे गरजेचे आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतीसाठी लागणारी खते तसेच बी बियाणे, कृषी यंत्र आणि शेती सोबतच मत्स्यपालन, पशुपालन इत्यादी व्यवसायांकरिता देखील कर्ज दिले जाते.

 किसान क्रेडिट कार्ड योजनेकरिता अर्ज करण्यासाठी काय करावे?

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर अर्जदार शेतकऱ्याला पीएम किसान पोर्टलवरून केसीसी फॉर्म डाऊनलोड करावा लागतो. तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अर्जदारांनी पासपोर्ट आकाराचा फोटो, सातबारा उतारा आणि खाते उताऱ्यासारखे शेतीशी संबंधित महत्वाची कागदपत्रे व स्वतःची वैयक्तिक माहिती व्यवस्थित फॉर्ममध्ये भरावी लागते.

त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळच्या शाखेत जमा करून खाते उघडणे गरजेचे असते. तुम्ही जर या करता करता पात्र असाल तर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड दिले जाते.

अशा प्रकारे किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.