Goat Farming Tips : गावात राहून शेळीपालन व्यवसाय कसा करायचा ? लक्षात ठेवा ह्या महत्वाच्या १० टिप्स !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Goat Farming :- शेळीपालन हा व्यवसाय कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी जागेत करता येतो आणि गुंतवणूक आवाक्यातच असते आणि मिळणारा नफा देखील जास्त असतो. याचा अनुषंगाने आता अनेक युवक नोकरीचा नाद सोडून शेळी पालन व्यवसायाकडे वळू लागले आहेत. कुठलाही व्यवसाय अगदी काटेकोरपणे सुरू केला आणि त्यामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या बाबी व्यवस्थित पार पाडल्या तर यशस्वी होतो.

अगदी हीच बाब शेळी पालन व्यवसायाला देखील लागू पडते. शेळी पालन व्यवसायाची सुरुवात करताना त्याचे संपूर्णपणे माहिती घेऊन सुरुवात करणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यकाळात होणारे आर्थिक नुकसानी पासून तुमचा बचाव होऊ शकतो. चला तर मग या लेखात आपण संपूर्ण या व्यवसाय बद्दल माहिती पाहू.

 सुरुवात करण्यापूर्वी शेळ्यांच्या योग्य जातींची निवड महत्त्वाची

शेळीपालन व्यवसायाचे हे असे मुख्यत्वे करून तुम्ही शेळी पालन व्यवसाय करता कोणत्या जातीची शेळी निवडत आहात यावर संपूर्ण व्यवसायाचे यश अवलंबून असते. त्यामुळे तुम्हाला शेळी पालन व्यवसाय करता जर जातींची निवड करायची असेल तर ती प्रामुख्याने मांस उत्पादन, शेळ्यांचे दूध उत्पादन इत्यादी गोष्टी डोळ्यासमोर ठेवून  निवड करावी. तुमच्याकडील हवामान, उपलब्ध साधनसामग्री आणि बाजारपेठेत असलेली मागणी यासारख्या घटकांचा विचार करणे गरजेचे आहे.

 शेळ्यांसाठी योग्य निवारा उभारणे

शेळ्यांचे आरोग्य उत्तम राहावे याकरिता त्यांचा निवारा योग्य पद्धतीने उभारणे खूप गरजेचे आहे. विपरीत हवामान परिस्थितीचा आणि इतर प्राण्यांपासून शेळ्यांचे संरक्षण व्हावे याकरिता व्यवस्थित निवारा तयार करणे गरजेचे आहे. यांचा निवारा तयार करताना तो हवेशीर आणि शेळ्या आरामात फिरू शकतील एवढ्या आकाराचा असणे गरजेचे आहे.

 शेळ्यांसाठी दर्जेदार चारा खाद्याचे नियोजन

शेळ्यांचे आरोग्य उत्तम राहावे व त्यांची उत्पादकता वाढावी याकरिता त्यांना संतुलित आहार देणे खूप गरजेचे आहे. शेळ्यांचे वय तसेच जात इत्यादी बाबी डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या आहाराचे नियोजन करणे खूप गरजेचे आहे. शेळ्यांच्या आहारामध्ये धान्य तसेच चारा आणि इतर पूरक आहाराचा समावेश करणे महत्त्वाचे असून याकरिता तुम्ही पशुवैद्यकीय किंवा पशुधन पोषण तज्ञांचा सल्ला घेऊन नियोजन केले तर खूप फायद्याचे ठरू शकते.

 आरोग्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन

तुमच्या शेडमध्ये निरोगी शेळ्या असणे हा यशस्वी शेळीपालनाचा मूलमंत्र आहे. याकरिता तुमच्या  शेळ्यांच्या कळपावर आरोग्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वेळोवेळी पशुवैद्यकीय यांसोबत चर्चा करून त्यांची तपासणी करून घेणे व शेळ्यांना  कुठल्याही प्रकारचा रोग होऊ नये याकरिता लसीकरण, वेळेवर जंतनाशक वापरणे खूप गरजेचे आहे व योग्य स्वच्छता पद्धतींचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे.

 शेळ्यांचे प्रजनन आणि पुनरुत्पादक प्रक्रियेवर लक्ष ठेवणे

शेळीपालनामध्ये कळपाची देखभाल आणि गोठ्यातील शेळ्या वाढाव्या याकरिता शेळ्याच्या प्रजननक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. शेळ्यांच्या गर्भधारणे दरम्यान सगळ्या बाबींची काळजी घेणे महत्त्वाचे असून विणतंत्र आणि त्याबद्दलची योग्य काळजी त्याबद्दल व्यवस्थित माहिती करून घेणे गरजेचे आहे. कळपातील शेळ्यांचा एक सुनियोजित प्रजनन कार्यक्रम  तुमच्या शेळ्यांच्या कळपातील अनुवंशिक गुणांमध्ये वाढ करू शकतो.

 शेळ्यांचे दूध काढण्याचे तंत्र आणि दुधाचे उत्पादन

जर तुम्हाला शेळ्यांच्या दुधामध्ये स्वारस असेल तर दूध काढण्याचे तंत्र आत्मसात करणे गरजेचे आहे. याकरिता शेळ्यांचे दूध काढण्याचे काही उपकरणांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे असून दूध काढण्याकरिता स्वच्छ आणि आरामदायक वातावरण तयार करणे गरजेचे आहे.

 शेळीपालनाचे अर्थशास्त्र आणि एकंदरीत खर्चाचे अंदाजपत्रक

शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या व्यवसायासाठी लागणारा संपूर्ण पैशाचे बजेट तुम्ही डिटेल्स मध्ये तयार करणे गरजेचे आहे. त्यामध्ये शेळ्यांसाठी निवाराची उभारणी, त्याच्याकरता लागणारे खाद्य तसेच आरोग्यविषयक महत्त्वाच्या सेवा आणि विक्री पर्यंतचा खर्च यामध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. यामधून तुम्हाला शेळ्यांची विक्रीतून  किती उत्पादन मिळू शकते याचा देखील हिशोब ठेवणे गरजेचे आहे. या सगळ्या बाबींमुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायाची आर्थिक व्यवहार्यता समजण्यास खूप फायदा होईल.

 शेळी उत्पादनांचे मार्केटिंग

शेळ्यांच्या विक्रीकरिता जे काही ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याकरिता मार्केटिंग कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. याकरता तुम्ही स्वतःची वेबसाईट तयार करू शकता किंवा सोशल मीडिया प्लेटफॉर्मच्या माध्यमातून देखील तुमच्या शेळ्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात. यामध्ये तुमच्या गोठ्यातील शेळ्यांची वैशिष्ट्ये आणि गुणवत्ता यावर जोर देऊन त्यांची जाहिरात करणे खूप गरजेचे आहे.

 शेळीपालनासाठी काही महत्त्वाच्या बाबी

शेळीपालनामध्ये जर तुम्ही काही महत्त्वाच्या शाश्वत पद्धती लागू केल्या तर नक्कीच व्यवसाय वाढीसाठी याचा फायदा होतो. यामध्ये शेळ्यांना बाहेर सोडून चरण्याची सवय करणे तसेच गोठ्यातील कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य करणे आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला शक्य असेल तेव्हा नैसर्गिक उपाय योजना करणे खूप गरजेचे आहे.

 अशा पद्धतीने करा व्यवसायात वाढ

जसा जसा तुमचा शेळीपालनाचा व्यवसाय ग्रोथ करेल तसतसा तुम्ही तुमच्या गोठ्यातील कळप वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर आणि विविधता आणण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. तसेच तुमचा व्यवसाय वाढावा याकरिता तुम्ही स्थानिक व्यवसाय तसेच रेस्टॉरंट आणि शेळीपालन व्यवसायाचे संबंधित असलेल्या व्यक्तींशी संपर्क करणे गरजेचे आहे.

अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने शेळीपालन व्यवसायामध्ये यश मिळवू शकता.