भावा मानलं तुला! शेळीपालन करून कमवतोय वर्षाला 3 कोटी रुपये; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Goat Farming :- भारतात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेती समवेतच पशुपालन (Animal Husbandry) करत असतात.

पशुपालनात गाईचे, म्हशीचे तसेच शेळीचे देखील पालन (Goat Farming) केले जाते. गाई व म्हशी पालनातून अनेक शेतकरी बांधव (Farmers) करोडो रुपये कमवत आहेत मात्र उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील एक अवलिया शेतकरी शेळीचे पालन करून वर्षाकाठी तीन कोटी रुपयांची उलाढाल करत आहे.

ऐकून कदाचित आपणास वाटत असेल मात्र हे सत्य आहे. यूपीच्या बुलांदशहर या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या मुनेन्‍द्र सिंह यांनी ही किमया साधली आहे.

गेल्या सहा वर्षांपासून मुनेन्‍द्र सिंह शेळी पालन करत असून यातून ते वर्षाकाठी कोट्यावधींची उलाढाल करत आहेत. विशेष म्हणजे मुनेन्‍द्र सिंह यांनी इंजीनियरिंग (Engineering) केल्यानंतर काही काळ विदेशात देखील नोकरीनिमित्त तसेच शिक्षणानिमित्त वास्तव्य केले आहे.

फॉरेनमध्ये शिक्षण आणि नोकरी देखील मुनेंद्र सिंह सांगतात की, त्यांचे वडील फॉरेस्ट खात्यात काम करत होते. त्यांनी 2000 मध्ये 12वी पूर्ण केल्यानंतर इलेक्ट्रिकलमध्ये इंजिनीअरिंग आणि नंतर एमबीए केले. त्यानंतर मुनेंद्र एका खासगी कंपनीत नोकरीला लागला. पण, काही वर्षांनी तो नोकरी सोडून इंग्लंडमध्ये शिकायला गेला. पुन्हा एमबीए केले आणि तिथल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये नोकरीला लागले. कुटुंबातील काही अडचणींमुळे 2014 मध्ये मुनेंद्र यांनी नोकरी सोडली आणि आपल्या मायदेशी परत आले. आता इथे त्यांना उदरनिर्वाहाचे मोठे संकट दिसू लागले होते.

सुरवातीला केवळ 13 शेळींचे पालन मुनेंद्र सिंह सांगतात की, त्यांचा एक मित्र दिवाकर म्हैसूरमध्ये राहत होता. त्याला शेळीपालन करायचे होते. त्यासाठी दोघेही अमृतसरला गेले, मात्र दलालाच्या प्रकरणात अडकल्याने त्यांना खरेदी करता आली नाही.

त्यानंतर त्याचा मित्र दिवाकरने मुनेंद्रला आपण निघून जात असल्याचे सांगितले. मुनेंद्र 200 शेळ्या खरेदी करून म्हैसूरला पाठवतील. आणि त्या बदल्यात तो त्यांना कमिशन देईल. यामुळे मुनेंद्रला 30,000 पेक्षा जास्त नफा झाला. त्यातून मुनेंद्र यांनी हळूहळू शेती सुरू केली. सुरुवातीला त्यांनी फक्त 13 शेळ्या खरेदी केल्या होत्या.

600 बकरीचे संगोपन करत आहे मुनेंद्र मुनेंद्र सांगतात की, सध्या त्यांच्या शेतात जवळपास 600 शेळ्या-मेंढ्या आहेत. जे वेगवेगळ्या जातीचे आहेत. त्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत असल्याचे मुनेंद्र यांचे मत आहे. सध्या ते जातीवर काम करत आहेत. ते म्हणतात की मटणासोबतच बकरीचे दूध सर्वात फायदेशीर आहे. यातून तूप काढणे आणि दूध उत्पादन करण्याचे नियोजन आम्ही करत आहोत. ते अनेक राज्यांमध्ये त्याचा पुरवठा करतात. मुनेंद्र मुख्यतः दक्षिणेला त्याचा पुरवठा करतात.

वार्षिक 3 कोटीची उलाढाल मुनेंद्र सिंह सांगतात की, त्यांचा वार्षिक व्यवसाय 3 कोटींच्या जवळपास आहे. वेगवेगळ्या जातीच्या शेळ्यांना कमी अधिक दर मिळत असतो. 32 हजार स्क्वेअर फूटमध्ये त्यांचे गोटफार्म आहे. देशात प्रामुख्याने शेळ्यांच्या 30 जाती आढळतात.

यापैकी बीटल हा सर्वात जास्त किमतीचा मानला जातो. त्यानंतर जमुनापरी, सिरोही, उस्मानाबादी, बारबारी या जातींचे संगोपन करून शेतकऱ्यांना बंपर फायदा होऊ शकतो असे देखील मुनेंद्र यांनी स्पष्ट केले.