एका गावात 800 एकर टरबूज लागवडीतून मिळवले शेतकऱ्यांनी कोट्यावधीचे उत्पन्न! कलिंगड लागवडीने केले ‘या’ गावच्या शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बाजारपेठेचा अभ्यास करून केलेली हंगामनिहाय पिकांची लागवड शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न देऊन जाते. ज्याप्रमाणे राज्यातील काही जिल्हे हे एका विशिष्ट पिकाकरिता ओळखले जातात. तसेच काही गावांमध्ये देखील काही हंगामामध्ये विशिष्ट अशा पिकांची लागवड करण्याचा ट्रेंड आपल्याला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी दिसून येतो.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नेमके व्यवस्थापन या  माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर भरघोस असे उत्पादन तर मिळवतातच व त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची आर्थिक गंगादेखील गावात आणतात.

असेच काहीतरी परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात असलेल्या व गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या उमरा गावातील शेतकऱ्यांनी केलेले आहे. या गावच्या शेतकऱ्यांचा टरबूज लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणावर हातखंडा असून यावर्षी देखील या गावच्या शेतकऱ्यांनी टरबूज उत्पादनातून कोट्यावधी रुपयांची कमाई केलेली आहे.

 उमरा गावातील शेतकऱ्यांनी केले 800 एकर टरबूज लागवड

याबाबत सविस्तर वृत्त असे की, परभणी जिल्ह्यात असलेल्या पाथरी तालुक्यातील उंबरा हे गाव गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी असल्यामुळे या गावच्या शेतकऱ्यांनी यावर्षी टरबूज लागवडीचा निर्णय घेतला व तब्बल 800 एकर क्षेत्रावर टरबूज लागवड करण्यात आली.

नशिबाने या वर्षी साथ देत दर देखील चांगले मिळाले व जवळपास तीनच महिन्यात वीस कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न उमरा येथील शेतकऱ्यांनी प्राप्त गेले. निसर्गाच्या संकटांमुळे त्रस्त झालेल्या येथील शेतकऱ्यांचे मात्र लागवडीतून अर्थकारणच बदलून गेले आहे.

तसे पाहायला गेले तर हा परिसर गोदावरी नदीच्या काठावर असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड करण्यात येते. जायकवाडी धरणाचा डावा कालवा आणि गोदावरी नदीच्या पात्रातील तीन उच्च पातळीचे बंधारे यामुळे या ठिकाणी पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असून ऊस पिक मोठ्या प्रमाणावर घेतात.

परंतु यावर्षी या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी टरबूज लागवड करण्याचे निश्चित केले व दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील एकूण 800 एकर क्षेत्रावर या गावच्या शेतकऱ्यांनी टरबूज लागवड केली.

दरवर्षी टरबूज लागवड करत असल्यामुळे टरबूज लागवडीच्या बाबतीत सर्व व्यवस्थापनाच्या पद्धती या शेतकऱ्यांना माहिती असल्यामुळे भरघोस उत्पादन मिळवण्यात ते यशस्वी झाले. तसेच यावर्षी बाजारभाव देखील चांगले मिळाल्याने कमी कालावधीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न टरबूजाने या वर्षी दिले.

 एकरी मिळवला वीस ते पंचवीस टन टरबूजचा उतारा

या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी टरबूज उत्पादनामध्ये चांगलाच हातखंडा मिळवला असून सरासरी जर एकरी टरबुजाचे उत्पादन बघितले तर ते वीस ते 25 टनापर्यंत मिळवण्यात शेतकरी यशस्वी झाले. साधारणपणे फेब्रुवारी महिन्याची सुरुवात व मार्च महिन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतातून टरबूज पीक काढण्याचे काम सुरू करण्यात आलेले होते

व सध्या उन्हाचा पारा वाढल्यामुळे टरबूज व इतर फळांना देखील चांगली मागणी असल्यामुळे बाजारभाव देखील चांगला मिळत आहे. तसेच पाण्यापासून तर खत व्यवस्थापन व कीटकनाशकांच्या साह्याने रोग व्यवस्थापन इत्यादी गोष्टी वेळेवर केल्यामुळे एक टरबूज सहा ते सात किलो पर्यंत वजनाचे भरत आहे.

टरबूज हे दर्जेदार असल्यामुळे व्यापारी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन टरबुजाची खरेदी करत करत असून सरासरी पंधरा रुपये किलोप्रमाणे दर या ठिकाणच्या शेतकऱ्यांना मिळत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्ये या गावाच्या शेतकऱ्यांनी टरबूज पिकापासून तब्बल वीस कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळाल्याचे देखील या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.