Mansoon: धक्कादायक! महाराष्ट्रात मान्सून तब्बल 10 दिवस उशिरा दाखल होणार, ‘या’ तारखेला आता मान्सूनचा पाऊस येणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mansoon Update: गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या बांधा पासून ते कृषी विभागाच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र मान्सून बाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.

भारतीय हवामान विभाग (Indian Meteorological Department) रोजाना मान्सून (Mansoon) बाबत लोकांना अपडेट करत आहे. शेतकरी बांधव (Farmers) अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची प्रतीक्षा करताहेत.

याशिवाय उकाड्याने हैराण झालेली जनता देखील मान्सूनची (Mansoon Rain) मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र असे असले तरी या वर्षी लवकर दाखल होणारा मान्सून सध्या रखडला असल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, या वर्षी मान्सून वेळेआधीच केरळमध्ये (Kerala Mansoon) दाखल झाला. दरवर्षी मान्सून हा एक जूनला केरळमध्ये दाखल होत असतो.

मात्र यावर्षी मान्सून हा 29 मे ला केरळमध्ये दाखल झाला आहे आणि सध्या मान्सूनचा प्रवास हा अतिशय कासवगतीने सुरू आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने तीन जूनला मान्सून हा महाराष्ट्राच्या तळ कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज सार्वजनिक केला होता.

मात्र आता भारतीय हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार मान्सून हा 12 जून पर्यंत महाराष्ट्राच्या वेशीत प्रवेश करणार आहे अर्थातच आधी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून हा तब्बल दहा दिवस उशिरा महाराष्ट्र गाठणार आहे.

यामुळे निश्चितच चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार असून उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस अजून काही काळ मान्सूनची अशीच वाट बघावी लागणार आहे.

खरं पाहता, 3 जून पर्यंत मान्सून हा राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज विभागाने वर्तवला होता मात्र 3 जूनला उलटून आता चार दिवस झालेत मात्र अजूनही राज्यात मान्सूनचे आगमन झालेले नाही.

आता, पुणे वेधशाळेचे प्रमुख हवामान तज्ञ अनुपम कश्यपी यांनी राज्यात मान्सून दाखल होण्याबाबत महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली आहे. त्यांच्या मते मान्सून हा आगामी सात ते दहा दिवसात राज्यात पदार्पण करणार आहे.

या शिवाय आता मॉन्सून अरब समुद्र, बंगालची खाडी, केरळ आणि तमिळनाडू आणि कर्नाटकातील काही भागात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील दोन ते चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा देखील इशारा यावेळी दिला आहे. निश्चितच या मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्याने हैराण जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे.

मात्र असे असले तरीही शेतकरी बांधवांनी शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला यावेळी कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देत आहेत.

राज्याचे कृषिमंत्री दादाजी दगडू भुसे यांनी देखील असाच सल्ला नुकत्याच काही दिवसांपूर्वी शेतकरी बांधवांना दिला होता. दादा भुसे यांच्या मते, शेतकरी बांधवांनी पेरणी करण्यासाठी घाई न करता 100 मिलिमीटर पाऊस झाला तरच पेरणी करावी अन्यथा शेतकरी बांधवांना दुबार पेरणी करावी लागू शकते. यामुळे शेतकऱ्यांचे श्रम आणि पैसा दोन्ही वाया जाण्याची शक्यता असते.