Monsoon Update: पंजाबरावांचा नविनतम मान्सून अंदाज आला…! आज ‘या’ विभागात जोरदार पावसाची शक्यता, वाचा पंजाबरावांचा संपूर्ण अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मान्सून (Monsoon) सक्रिय झाला असून राज्यात सर्वत्र पावसाची (Rain) जोरदार हजेरी बघायला मिळत आहे. राज्यातील काही भागात पेरणीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत तर काही भागात पेरणीची कामे उरकली असून आता कोळपणीला सुरुवात होणार आहे तर काही भागात अजूनही पेरणीची कामे झालेली नाहीत. या तिन्ही परिस्थितीत शेतकरी बांधव मान्सूनच्या (Monsoon News) पावसाची वाट पाहू लागला आहे.

ज्या शेतकऱ्यांची अद्याप पेरणी झालेली नाही त्या शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढली असून शेतकरी बांधव चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकरी बांधवांचे मान्सूनच्या अंदाजाकडे अतिशय बारीक लक्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या अचूक हवामान अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या पंजाबराव डख साहेबांच्या अंदाजाकडे (Panjabrao Dakh Havaman Andaz) देखील शेतकरी बांधवांचे मोठे बारीक लक्ष लागून असते.

दरम्यान पंजाबराव डख (Panjabrao Dakh) साहेबांचा नवीनतम सुधारित अंदाज त्यांनी सार्वजनिक केला आहे. पंजाबरावांच्या नवीन मान्सून अंदाजानुसार (Panjab Weather Update), आज आपल्या महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस होणार आहे.

राज्यातील राजधानी मुंबईत आज अति मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवली आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यात देखील आज मोठा पाऊस कोसळणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मराठवाड्यातील औरंगाबाद तसेच इतरही काही जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे.

पंजाबराव यांच्या मते, या वर्षी राज्यात सर्वत्र भाग बदलत पाऊस पडणार आहे. यावर्षी मोसमी पाऊस हा दररोज कोसळणार आहे मात्र भाग बदलत कोसळणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे देखील यावेळी त्यांनी नमूद केले.

पंजाबराव यांच्यामध्ये 30 जून ते पाच जुलै या दरम्यान राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. 10 जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र पाऊस होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी नमूद केले आहे. जवळपास पंधरा दिवस सलग राज्यात पाऊस कोसळणार असल्याचे समजतं आहे.

पंजाबराव डख यांनी पुढे सांगितले की ज्या भागात अजून पेरणीची कामे झालेले नसतील त्या भागात लवकरच पेरणीची कामे आता उरकली जातील. शिवाय त्यांनी शेतकरी बांधवांना जमिनीची ओल तपासूनच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय हवामान विभाग तसेच राज्याचे कृषी विभाग यांनी देखील शेतकरी बांधवांना 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन केले आहे.