Monsoon Update: पंजाबरावांचा जुलैचा मान्सून अंदाज…! आज राज्यात या ठिकाणी पाऊस, वाचा पंजाबरावांचा सुधारित अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update: राज्यात जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात मोसमी (Monsoon) पावसाला सुरवात झाली होती. खरे पाहता मान्सून (Monsoon News) राज्यात जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात दाखल झाला, मात्र जुनच्या पहिल्या पंधरवड्यात मोसमी पावसाला (Rain) साठी पोषक वातावरण तयार झाले नसल्याने पहिल्या पंधरवाड्यात अपेक्षित असा पाऊस झाला नाही. यामुळे राज्यातील अनेक भागात पेरणीच्या कामाला मोठा उशीर झाला.

अजूनही राज्यातील अनेक भागात अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राजधानी मुंबई तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात व कोकणातील काही जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी बघायला मिळत आहे. एवढेच नाही विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील मोसमी पावसाला आता सुरुवात झाली आहे.

मात्र असे असले तरी विदर्भ व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अजूनही आतापर्यंतच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. यामुळे शेतकरी बांधवांचे अजूनही पेरणीसाठी मान्सून कडे लक्ष लागून आहे. शिवाय ज्या शेतकरी बांधवांची पेरणी झाली आहे असे शेतकरी बांधव देखील पिकांच्या जोमाने वाढीसाठी मोसमी पावसाची वाट पाहत आहेत.

यामुळे सध्या शेतकरी राजा मान्सून अंदाजाकडे बारीक लक्ष ठेवून आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपले नाव गाजवणार्‍या परभणी पुत्र पंजाबराव डख साहेबांचा जुलै महिन्याचा मान्सून अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) सार्वजनिक करण्यात आला आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, पंजाब रावांच्या मान्सून अंदाजावर (Panjab Dakh Weather Report) राज्यातील शेतकरी बांधवांचा गाढा विश्वास आहे.

शेतकऱ्यांच्या मते पंजाबरावांचा (Panjabrao Dakh) मान्सून अंदाज त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत असून त्यांच्या मान्सून अंदाजामुळे शेतीतील कामे योग्य नियोजनाने करता येणे शक्य होत आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया पंजाबरावांचा (Panjabrao Dakh News) सुधारित मान्सून अंदाज.

राज्यात कसं असेल आज हवामान कुठं पडणार पाऊस 

पंजाब राव यांच्या मते, आज राज्यात तुरळक ठिकाणी मोसमी पाऊस बरसणार आहे. आज पडणारा पाऊस मात्र महाराष्ट्रात सर्वत्र नसणार याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील पंजाबराव यांनी केले आहे. पंजाबराव यांच्या मते आज भाग बदलत महाराष्ट्रातील काही भागात दमदार पावसाच्या सऱ्या बरसणार आहेत.

5 जुलै पासून पावसाचा जोर वाढणार

दरम्यान, पंजाबराव यांनी वर्तवलेल्या नवीनतम सुधारित अंदाजानुसार, पाच जुलै पासून राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे. 5 जुलै ते 12 जुलै या कालावधीत राज्यात सर्वत्र मान्सूनचा पाऊस दमदार हजेरी लावणार असल्याचे डख यांनी स्पष्ट केले.

या कालावधीत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात विशेषतः जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी राहणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे. या कालावधीत राज्यातील सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांची पेरणी शक्‍य होणार असल्याचे पंजाब राव यांनी सांगितले आहे.