Monsoon Update: पंजाबरावांचा अंदाज आला…! उद्यापासून राज्यात मुसळधार पाऊस; वाचा पंजाबरावांचा मान्सून अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update: महाराष्ट्रात काल अनेक जिल्ह्यात मान्सूनच्या (Monsoon) पावसाला सुरवात झाली असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे पेरणीसाठी खोळंबलेल्या शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे भाव बघायला मिळाले. मोसमी पावसाच्या (Rain) जोरदार आगमनामुळे राज्यात पेरणीच्या कामाला आता गती मिळणार आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शिवाय राज्यातील उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस दमदार मोसमी पावसामुळे आराम मिळाला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आपल्या अचूक हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळीच छाप सोडणारे परभणीपुत्र पंजाबराव डख यांचा नवीनतम सुधारित मान्सून (Monsoon News) अंदाज जाहीर करण्यात आला आहे. मित्रांनो खरं पाहता शेतकरी बांधव पंजाब राव यांच्या हवामान अंदाजाकडे (Panjabrao Dakh Havaman Andaz) कायमच बारीक लक्ष राखून असते. अशा परिस्थितीत पंजाबराव (Panjabarao Dakh) यांचा नवीन सुधारित मान्सून अंदाज आज आपण बघणार आहोत.

पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांच्या मते, राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. खरं पाहता मोसमी पावसाला सुरुवात 19 जून पासून झाल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले. राज्यात आता सलग 2 जुलै पर्यंत भाग बदलत पाऊस कोसळणार असल्याचे पंजाब राव (Panjab Dakh Weather Report) यांनी नमूद केले. म्हणजेच दोन जुलै पर्यंत राज्यात सर्वदूर मोसमी पाऊस कोसळणार आहे.

याशिवाय, पंजाबराव यांच्या मते, 22, 23, 24, 25, 26, 27 जून यादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणजेच राज्यात उद्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. पंजाबराव डख यांच्या या अंदाजामुळे निश्चितच ज्या शेतकरी बांधवांनी पेरणीचे काम उरकले आहेत त्यांच्या चेहर्‍यावर समाधान पाहायला मिळत आहे. शिवाय ज्या शेतकरी बांधवांची पेरणीपावसाअभावी खोळंबली आहे त्या शेतकऱ्यांना देखील या पावसाचा फायदा होणार असून राज्यात लवकरच सर्व दूर पेरणी बघायला मिळणार आहे.

पंजाबराव डख यांनी शेतकरी बांधवांना ओल तपासूनच पेरणी करावी असा सल्ला देखील यावेळी दिला आहे. जमिनीत जर चार बोट ओल असेल तर पेरणी करू नका असे देखील मत पंजाब राव यांनी यावेळी मांडले. दरम्यान राज्याच्या कृषी विभागाने देखील शेतकरी बांधवांना पेरणीसाठी घाई करू नये आणि शंभर मिलिमीटर पाऊस झाला तरच पेरणी करावी असा सल्ला जारी केला आहे.

सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात पेरणीच्या कामासाठी लगबग पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने आता लवकरच राज्यात सर्वत्र खरीप हंगामातील पेरणीची कामे आपटली जातील असा अंदाज आहे. निश्चितच पंजाबराव यांच्या या अंदाजामुळे पुन्हा एकदा शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.