Mustard Cultivation : रब्बी हंगाम आला मोहरी पेरणीचा टाईम झाला…! मोहरीच्या शेतीतून अधिक कमाई करायची मग लागवडीची पद्धत जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mustard Cultivation : सध्या देशात खरीप हंगाम (Kharif Season) सुरू असून येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabbi Season) सुरुवात होणार आहे. मित्रांनो आपल्या देशात रब्बी हंगामात तेलबिया पिकांची देखील शेती (Farming) केली जाते. मोहरी (Mustard Crop) हे देखील असच एक तेलबिया पीक आहे.

मोहरी हे रब्बी हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. हे तेलबिया पीक (Oilseed Crop) आहे आणि त्याला मर्यादित सिंचनाची आवश्यकता आहे, त्यामुळे त्याची लागवड (Mustard Crop Farming) इतर पिकांच्या तुलनेत सोपी आहे. मात्र मोहरीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये चांगले बियाणे, चांगले खत (Fertilizer) व इतर गोष्टींचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.

शेत कसे तयार करावे

इतर कोणत्याही पिकाप्रमाणे मोहरीच्या लागवडीमध्ये प्रथम शेत तयार करावे लागते. शेतीची चांगली पूर्व मशागत केल्यास मोहरीच्या पिकातून चांगली कमाई (Farmer Income) होणार आहे. त्याचे शेत तयार करण्याची प्रक्रिया मे, जूनपासून सुरू होते.

न्हाळ्यात शेतं रिकामी झाल्यावर नांगरट किंवा नांगराच्या साह्याने नांगरणी करून मोकळे सोडावे म्हणजे पावसाळ्यात ते जमिनीत चांगले शोषून घेतील. पाऊस संपल्यानंतर किमान तीन नांगरणी करावी, नांगरणीसाठी नांगर किंवा इतर मशागत साधन वापरावे. यानंतर फळी टाकून माती समतल करून बारीक करावी.

बियाणे किती लागत 

बागायती क्षेत्रात पेरणीसाठी एक एकरमध्ये 2.5 ते 3 किलो बियाणे वापरावे. शेतात ओलावा कमी असल्यास गंधकाचा वापर करावा म्हणजे शेतात ओलावा टिकून राहील.

पेरणीची वेळ

दरवर्षीच्या तुलनेत पावसाने दडी मारल्याने मोहरीची पेरणी पूर्णपणे सुरू झालेली नाही. परंतु मोहरी पेरणीसाठी योग्य वेळ सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मानली जाते. मोहरी पेरणीसाठी शेतातील ओलावा लक्षात घेऊन 9 किंवा 7 फूट असलेल्या नांगरणी यंत्राचा वापर करावा. याशिवाय मोहरीचे बियाणं 5 ते 6 सें.मी. खोल रुजले पाहिजे.

खत व्यवस्थापन 

मोहरीचे चांगले उत्पादन घेण्यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. माती परीक्षणादरम्यान गंधकाची कमतरता आढळून आल्यास एकरी 8 ते 10 किलो झिंक सल्फेटचा वापर करावा.  यासोबतच शेताची अंतिम नांगरणी करताना प्रति एकर 25 ते 30 क्विंटल जून कुजलेलं शेणखत टाकावे. याशिवाय पेरणीनंतर 25-30 दिवसांनी 20 ते 25 किलो नत्राची मात्रा फवारणीच्या स्वरूपात वापरावी.