बुरशी रोगामुळे कांदा पीक धोक्यात ! कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion News : विचित्र हवामान, अवकाळी पाऊस, यामुळे जमिनीतील बुरशीचे प्रमाण वाढले आहे. रोप व लागवड झालेला कांदा अज्ञात रोगाने अचानक पिवळा पडून कांदा रोपाला गोलाकार आळेपिळे पडले आहेत. पीक धोक्यात येण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, चितळी, पाडळी, आदिनाथनगर तसेच इतर गावांत गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी मशागती करून कांदा लागवड केली. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी बी-बियाणे, कांदा रोपे, खते, लागवड, यावर मोठा खर्च केला आहे.

परंतू वातावरण बदलाने कांदा पिवळा पडून रोपाला गोलाकार आळे पिळे पडलेले दिसत असून, सकाळच्या सुमारास निर्माण होणारे धुके, यामुळे कांदा पिकावर मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

वातावरणाचा फटका कांदा पिकास बसल्यास उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याने कांदा शेतकरी संदिप उगले यांना ४ नोव्हेंबर रोजी अडीच एकर कांदा पिकाची लागवड केली आहे.

बी बियाणे, कांदा रोपे, खते, लागवड नांगरणी, यासाठी आजपर्यंत त्यांच्या ७५ ते ८० हजार रुपये खर्च झाले आहे. मात्र, वातावरण बदलाने कांदा पीक अचानक पिवळे पडून बुरशी प्रमाण वाढल्याने फवारणीचा खर्च वाढला आहे. वातावरण असेच राहिले तर कांदा पीक सोडून द्यावे लागणार असल्याचे शेतकरी शेतकरी उगत यांनी सांगितले.