PM Kisan 14 Installment : कामाची बातमी! चार दिवसांनंतरही आले नाहीत १४व्या हफ्त्याचे पैसे? तर ताबोडतोब या नंबरवर करा कॉल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan 14 Installment : केंद्र सरकारकडून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना १४ हफ्ते देण्यात आले आहेत. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर १४व्या हफ्त्याचे पैसे जमा झाले नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जुलै 2023 रोजी पीएम किसान योजनेचा १४वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. याचा फायदा साडेआठ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना झाला आहे. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर १४व्या हफ्त्याचे २ हजार रुपये जमा झाले नाहीत.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात १४व्या हफ्त्याचे २ हजार रुपये जमा होऊन चार दिवस झाले आहेत. मात्र काही शेतकऱ्यांना १४व्या हफ्त्याचा लाभ मिळाला नाही. तुम्हालाही या १४व्या हफ्त्याचे पैसे मिळाले नसतील तर तुमच्यासाठी सरकारकडून एक हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.

पीएम किसान योजनेसाठी सरकारकडून टोल फ्री नंबर जारी करण्यात आला आहे. या नंबरवर कॉल करून तुम्ही १४व्या हाफटायचे पैसे का आले नाहीत याची चौकशी करू शकता. तसेच तुम्ही या नंबरवर कॉल केल्यांनतर कृषी विभागाकडून तुमच्या खात्यावर रक्कम पाठवली जाऊ शकते.

जर तुमचीही पीएम किसान योजनबाबत काही शंका किंवा तक्रार असल्यास तुम्ही सरकारकडून देण्यात आलेल्या टोल फ्री नंबरवर कॉल करून त्याचे निवारण करू शकता. तुम्ही पीएम किसान हेल्पलाइन नंबर 155261 किंवा टोल फ्री क्रमांक 1800115526 किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. तसेच सरकारकडून एक मेल आयडी देखील देण्यात आला आहे त्यावर तुम्ही तुमच्या तक्रारीसह मेल करू शकता. pmkisan-ict@gov.in या मेलवर तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

काही शेतकऱ्यांच्या खात्यात ४ दिवसानंतरही १४व्या हफ्त्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत. मात्र चिंता करण्याची काहीही कारण नाही. कारण काही वेळा आधार नंबर किंवा बँक खाते नंबर चुकीचा प्रविष्ट केल्याने खात्यात पैसे येत नाहीत.

तुम्ही या योजनेसाठी अर्ज करताना भरलेली सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून पाहू शकता. यासाठी तुम्हाला अधीकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुमच्या माहितीमध्ये काही त्रुटी असतील त्या त्वरित दुरुस्त करून घ्या. त्यानंतर लगेच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.

तसेच केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेमध्ये काही अपात्र शेतकरी लाभ घेत असल्याने ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच जमीन पडताळणी करण्यास देखील सांगण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांना १४व्या हफ्त्याचा लाभ मिळाला नाही.