शेतकऱ्याचा नांद नाही करायचा..! पट्ठ्याने टरबूज शेतीतुन चारचं महिन्यात कमविले तब्बल साडे चार लाख, सध्या भावड्याची सर्वत्र चर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer: देशातील सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येते की नवयुवक शेतकरी (Farmer) पुत्र आता शेती व्यवसायापासून (Farming) दुरावत चालले आहेत. त्याचं कारण देखील तसंच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने अनेक शेतकरी पुत्र आता शेती नको रे बाबा असं म्हणू लागले आहेत.

मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील बाजारपेठेतील अंदाज तसेच शेती व्यवसायात योग्य नियोजन  व काळाच्या ओघात केलेला बदल निश्चितच शेतकऱ्यांना फायद्याचा ठरत आहे. असंच साजेसे उदाहरण समोर आले आहे ते देवळा तालुक्यातून.

देवळा तालुक्यातील एका नवयुवक शेतकऱ्याने टरबूज पिकातून (Watermelon Crop) अवघ्या चार महिन्याच्या कालावधीत साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न (Farmers Income) प्राप्त करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. देवळा तालुक्यातील मौजे खामखेडा येथील युवा शेतकरी नंदू बच्छाव यांनी टरबूजचे दुबार पीक घेउन तब्बल साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न कमविले आहे.

युवा शेतकऱ्याच्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. खरं पाहता महिन्याभरापूर्वी टरबूज अतिशय कवडीमोल दरात विक्री होत होता. मात्र सद्यस्थितीला टरबूजचे दर समाधान कारक असून नंदू बच्छाव यांना याचा फायदा झाला आहे.

नंदू बच्छाव यांना 40 गुंठे क्षेत्रात मोजून 130 दिवसात तब्बल साडेचार लाखांची कमाई झाल्याने पंचक्रोशीत त्यांची मोठी चर्चा रंगली आहे. नंदू यांनी सुरुवातीला जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आपल्या 40 गुंठे क्षेत्रात टरबुज पिकाची लागवड (Watermelon Farming) केली.

यासाठी त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर केला. शेणखत, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन प्रणाली यासाठी नंदू यांना सुमारे 50 हजार रुपयांचा उत्पादन खर्च आला. लागवड केल्यानंतर मोजून 70 दिवसात टरबुजाचे पीक काढणीसाठी तयार झाले. त्यावेळी टरबूजला चांगला दर देखील मिळाला. सुमारे 35 टन टरबुजाचे उत्पादन त्यांना मिळाले. नंदू यांचे टरबूज साडेअकरा रुपये प्रति किलो या दराने विक्री झाले आणि त्यांना यातून खर्च वजा जाता पावणे तीन लाख रुपये निव्वळ नफा मिळाला.

टरबूज पिकातून चांगली कमाई झाल्याने नंदू यांनी त्याच शेतात पुन्हा टरबूज लागवडीचा निर्णय घेतला. या अनुषंगाने त्यांनी आधी लावलेल्या टरबुजाचे वेल व शेतजमिनीतील तन बाजूला सारले आणि टरबुजाचे रोप न लावता थेट बियाणे पेरले. टरबूज बियाणे लागवड केल्यानंतर पिकाची योग्य ती काळजी घेतली.

रासायनिक खतांची योग्य मात्रा टरबूज पिकाला दिली आणि 40 गुंठे क्षेत्रातून 20 टन टरबूज उत्पादित केले. यावेळी देखील टरबूजला आठ रुपये प्रति किलो दर मिळाला. टरबूज लागवडीसाठी 20 हजार रुपये खर्च वजा जाता त्यांना दीड लाखांची दुबार टरबूज पिकातून कमाई झाली. म्हणजेच टरबूज पिकातून अवघ्या चार महिन्यात नंदू यांना साडेचार लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. यामुळे खामखेडाचे सुपुत्र नंदू यांनी केलेल्या या प्रयोगाची सध्या पंचक्रोशीत मोठी चर्चा आहे.