नांदखुळा कार्यक्रम…!! लाख शेती च्या माध्यमातून ‘हे’ शेतकरी करतायेत वार्षिक 70 लाखांची कमाई; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer: मित्रांनो भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmers) आजही पारंपरिक शेतीतून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत आहेत.

विशेष म्हणजे आता पारंपरिक शेतीतून देखील योग्य नियोजनाने शेतकरी बांधव लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधत आहेत.

झारखंडमध्ये (Jharkhand) देखील काही शेतकरी बांधवांनी शेती व्यवसायात (Farming) आपल्या अपार कष्टाने लाखो रुपये उत्पन्न कमवून दाखवले आहे.

रांचीपासून (Ranchi) अवघ्या 30 किमी अंतरावर असलेल्या ओरमांझी ब्लॉकमधील हसटू गावातील सुमारे 150 लोक पलाशच्या झाडावर लाखेची लागवड करून लाखोंची कमाई करत आहेत.

ही शेती या गावातील लोकांची उपजीविका तर भागवतच आहे शिवाय यामुळे या गावाला एक वेगळी ओळखही प्राप्त झाली ​​आहे. 20 वर्षांपूर्वी जेव्हा लाखाची लागवड (Lacquer farming) फारशी प्रचलित नव्हती.

त्यावेळी त्याच गावातील देवेंद्रनाथ ठाकूर या तरुणाने लाख संशोधन केंद्र नामकुममधून सहा दिवसांचे प्रशिक्षण घेऊन लाखेची लागवड सुरू केली. आज ही शेती जंगलातील ग्रामस्थांसाठी लाखोंच्या उत्पन्नाचे साधन बनली आहे.

देवेंद्र सांगतात की त्यांच्या 7 एकर जमिनीपैकी त्यांनी फक्त 10 डिसमील फार्ममध्ये पलाशच्या झाडावर लाखेची लागवड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याला सुरुवातीच्या दिवसांत थोडा फायदा झाला.

पण जंगलातून उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने काम करत त्यांनी हळूहळू गावकरी जोडण्यास सुरुवात केली. मग काय, हळुहळू लाख लागवडीला चालना देण्यास सुरुवात केली आणि आज राज्यभर युवक युनियन आणि वन संरक्षण समितीचे दीडशे सदस्य कार्यरत आहेत.

या दोन्ही समित्यांच्या सदस्यांनी जंगलबहुल भागाला भेटी देऊन ग्रामीण भागातील लोकांना लाख लागवडीशी जोडण्यास सुरुवात केली.

परिणामी, आज या दोन्ही समिती मध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे एक लाखाहून अधिक लोक जोडले गेले आहेत आणि लाखाच्या शेतीत गुंतले आहेत. मात्र, आजपर्यंत या लोकांनी या कामासाठी कधीही शासनाकडून आर्थिक मदत घेतली नाही.

वर्षाला 70-80 लाख रुपये कमावतात

हसटू गावातील केवळ एकाच भागात 2329 पलाश वृक्षांचे जतन तर होतेच, पण रंगिणी व सेमिलता या झाडांवर कुसुमी लाहाची लागवड करून चांगला नफाही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच परिसरातील झाडांचेही संरक्षण करण्यात येत आहे.

गंमत म्हणजे झारखंडमधील डझनभराहून अधिक जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील लोकांना जोडून त्यांनी झाडांचे सर्वेक्षणही केले आणि सुमारे 15 लाख झाडे शोधून त्यावर लाख लागवड केली आहे.

सध्या सर्व शेतकरी एकत्रितपणे लाखाची शेती करून वर्षाला 70 ते 80 लाख रुपये कमावत आहेत. निश्चितच शेतकरी बांधवांसाठी या युवकाने नवीन आदर्श प्रस्थापित केला असून शेती तोट्याची म्हणणाऱ्या लोकांसाठी यामुळे निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.