Successful Farmer: ऐसे गुरुजी होणे नाही..!! गुरुजींनी शाळा सांभाळत शेती केली, नवीन प्रयोगातून शेतीत यशही मिळवले; वाचा शेतकरी गुरुजींची यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer: शेतीत (Farming) काळाच्या ओघात बदल करणे आता अतिमहत्त्वाचे बनले आहे. शेतीत (Agriculture News) काळाच्या ओघात बदल केला तर लाखों रुपयांची कमाई (Farmer Income) करणं सहज शक्य आहे.

परभणी (Parbhani) मधील एका प्राथमिक शाळेच्या गुरुजींनी देखील शाळा सांभाळत शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब करून लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. परभणीच्या मुंजाभाऊ शिलवणे या प्राथमिक शाळेच्या गुरुजींनी (Teacher) आपल्या विद्यार्थ्यांना प्रयोगाच्या माध्यमातुन शिकवले तसेच त्यांनी शेतीत देखील अत्याधुनिक प्रयोग करून नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

गुरुजींनी शेतीत केलेला बदल आणि मिळविलेले यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी सिद्ध होत आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया शिलवणे गुरुजींचा शेतीतला हा धडा नेमका आहे तरी काय.

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याच्या मौजे मांडाखळी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक मुंजाभाऊ शिलवणे शाळेत विद्यार्थ्यांना शिकवतात तसेच गावात शेती देखील यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. मुंजाभाऊ हे त्यांच्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर पाळोदे या ठिकाणी प्राथमिक शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

शिक्षक असतानादेखील शेतीवरचे त्यांचे प्रेम काही कमी झाले नाही म्हणून ते गावाकडे आपल्या वडिलोपार्जित अडीच एकर तसेच त्यांनी स्वतः काबाडकष्ट करून घेतलेली दीड एकर अशा एकूण चार एकर क्षेत्रात शेती करीत आहेत. चार एकर क्षेत्रात गुरुजींनी मोसंबी आणि आंतरपीक म्हणून सोयाबीनची लागवड केली आहे.

गुरुजींच्या मते, ते सकाळी-सकाळी उठून 8 वाजेपर्यंत शेतीतील सर्व कामे करतात आणि त्यानंतर शाळेत शिकवण्यासाठी जात असतात. त्यांचा हा दिनक्रम आहे. गुरुजींचे आई-वडील तसेच त्यांच्या अर्धांगिनी यादेखील शेतात राबत असतात. शेतीतील सर्व नियोजन गुरुजीच बघतात. गांडूळ खत शेणखत भाजीपाला दुग्ध उत्पादन देखील गुरुजी घेत असतात.

शेती व शेतीपूरक व्यवसायातून गुरुजी वर्षाकाठी पाच लाखांपर्यंतची कमाई करत आहेत. निश्चितच गुरुजींनी शाळा सांभाळत मुलांना घडवत यशस्वी शेती करून दाखवली आहे. यामुळे सध्या शिलवणे गुरुजींची चांगलीच चर्चा रंगली आहे. शिलवणे गुरुजींनी शेतीत केलेली ही कामगिरी इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणा देणारी सिद्ध होणार आहे.