Sunflower Farming : लई भारी…! पट्ठ्याने 10 हजार रुपये खर्च केला आणि 6 लाखांची कमाई केली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 Sunflower Cultivation : शेतीमध्ये योग्य नियोजन केले तर लाखो रुपये कमावले जाऊ शकतात. मग ती सूर्यफूल शेती (Sunflower Farming) का असेना. याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते गुजरात मधून.

जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या पारंपारिक शेतीतुन मिळत असलेल्या तुटपुंजी उत्पादनात समाधानी नसाल तर तुम्ही गुजरातच्या या अवलिया शेतकऱ्याच्या पद्धतीचा अवलंब करून चांगली कमाई करू शकता.

गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी राम वरु सूर्यफुलाची लागवड (Sunflower Cultivation) करतात. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राम यांनी 10 हजार रुपये खर्च करून सूर्यफूल शेती सुरू केली आणि पहिल्याच वर्षी त्यांना 6 लाख रुपयांचा नफा झाला.

राम आता सूर्यफुलाच्या शेतीतून चांगले उत्पन्न कमवत असल्याने समाधान व्यक्त करीत आहे याशिवाय तो सर्वांना सूर्यफूल शेती करण्याचा सल्ला देत आहे.

शेतकर्‍यांना त्यांच्या पारंपरिक शेतीत (Traditional Crop) नफा मिळाला नाही तर काळजी वाटते. राम सांगतात अशीच काहीशी काळजी त्यांना देखील वाटायची.

राम सांगतात की, त्यांचा परिवार पारंपारिक शेती करत होता, परंतु हवामान बदलामुळे (Climate Change) त्यांना गेली अनेक वर्ष खूप त्रास सहन करावा लागला.

त्यामुळे काही वर्षांपासून त्यांनी शेतीत काहीतरी नवीन करण्याचा विचार केला. विशेष म्हणजे शेतीत काहीतरी नवीन करायचा असा विचार फक्त डोक्यात होता मात्र हातात पैसा नव्हता.

या दरम्यान त्यांना काही शेतकरी भेटले जे सूर्यफूल शेती करत असत. राम यांनी त्यांच्या सांगण्यावरूनच सूर्यफुलाची शेती सुरू केली.

15 बिघे जमिनीवर सूर्यफूल शेती राम यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, “जेव्हा त्यांनी त्यांच्या 15 बिघा शेतजमिनीवर ज्वारी-गहूं या पिकाऐवजी सूर्यफुलाची लागवड करायला सुरुवात केली, त्यावेळी लोकांनी त्यांना टोमणे मारले? मात्र नंतर त्या लोकांना राम यांच्या बदलाच्या महत्त्व कळले.

जेव्हा राम यांनी पहिल्याच वर्षी सुमारे 6 लाख रुपये कमवले तेव्हा नाव ठेवणारे सर्व गावकरी त्यांची वाह-वाह करू लागले. राम म्हणाले की आता ते सूर्यफुलचे मार्केटिंगही करत आहेत.”

सूर्यफूल शेतीसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर राम म्हणाले की, सूर्यफुल हे पीक थंड प्रदेशात वाढते. त्यांनी गेल्या वर्षी या पिकाची लागवड हिवाळ्यात केली होती आणि त्याचे पीक मात्र 6 महिन्यांत काढणीसाठी तयार झाले होते. राम यांना सूर्यफुलाच्या शेतीतुन चांगले मुबलक उत्पादन मिळाले आणि त्यांनी सूर्यफूल शेतीतून चांगला पैसा उभा केला.

राम शेवटी म्हणाले की, या शेतीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती नैसर्गिकरीत्या केली जाते आणि बाहेरून कोणतीही रसायने किंवा खते टाकली जात नाहीत. त्यांनी देखील शेणापासून तयार केलेले कंपोस्ट खत तसेच शेणखताचा वापर केला यामुळे खर्चात बचत झाली शिवाय उत्पादन देखील चांगले मिळाले.