Farmer Success Story: भाकड गाईंचा असाही केला उपयोग! गाईच्या शेणापासून उभारला उद्योग, साधली आर्थिक समृद्धी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story:- पशुपालन व्यवसाय करत असताना दुधाचे उत्पादन हा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो व त्यासोबतच गाई व म्हशींच्या शेणाच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळत असते.

तसेच स्वतःच्या शेताकरिता देखील खत म्हणून शेणखताचा वापर केला जातो. यामध्ये जर आपण देशी गाईंच्या शेणाचा विचार केला तर खत म्हणून तर याचा वापर होतोच परंतु त्यापासून अनेक उत्पादने देखील तयार करता येतात. आपल्याला माहिती असेल

की यापासून आपल्याला रंग निर्मिती देखील करता येते. अगदी याच गोष्टींना हेरून देशी गोवंश संगोपनाची आवड असणाऱ्या आणि मनात प्रचंड जिद्द ठेवून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या

भिवगाव येथील बबनराव शिंदे यांनी गाईच्या शेणापासून धूप व अगरबत्ती बनवून त्यांची विक्रीचा व्यवसाय उभारला असून त्या माध्यमातून चांगले आर्थिक प्राप्ती ते मिळवत आहेत.

 बबनराव शिंदे यांनी उभारला शेणापासून व्यवसाय

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात भिवगाव हे गाव असून या ठिकाणी बबनराव उत्तमराव शिंदे हे राहतात. त्यांची दोन मुले उच्चशिक्षित असून ते नोकरी निमित्ताने बाहेर आहेत. बबनराव यांच्याकडे पाच एकर शेती आहे

व या शेतीमध्ये ते कपाशी व मका तसेच कांद्यासारखे पिकांचे उत्पादन घेतात. यासोबतच त्यांच्याकडे घरची एक देशी गाय होती व त्या गाईमुळेच त्यांना जनावरांची आवड निर्माण झालेली होती. या आवडीतूनच त्यांचा आजचा व्यवसाय उभा राहिलेला आहे.

त्यांच्या परिसरामध्ये ज्या गाई दूध देत नाहीत किंवा गाभण राहत नाहीत अशा गाई कसायाकडे विकली जात असेत. अशा गाई बबनराव यांनी विकत घ्यायला सुरुवात केली. या गाईंच्या माध्यमातून आज त्यांना एका वर्षाकाठी 20 ते 22 ट्रॉली शेणखत  मिळते.

परंतु त्यांनी या शेणाचा वापर खत म्हणून न करता त्यांच्या दोन्ही मुलांची मदत घेत त्यांनी त्यापासून धुप आणि अगरबत्ती बनवायला सुरुवात केली. संबंधीची माहिती त्यांच्या मुलांनी इंटरनेटवर बघून घेतली व आज त्यामध्ये यशस्वी झाल्याचे दिसून येते.

सुरुवातीला त्यांनी बनवलेले हे धूप यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोफत दिली व नंतर लोकांच्या पसंतीस आल्याने त्या धुपची मागणी वाढली.

त्यानंतर व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने त्यांनी यासाठी लागणारी यंत्रे खरेदी केली व आता मुलांच्या मदतीने बबनराव व त्यांच्या पत्नी शोभाबाई शिंदे या या व्यवसायामध्ये यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत.

 धूप अगरबत्तीची विक्री अशा पद्धतीने केली जाते

 बबनराव शिंदे व त्यांच्या पत्नी या राज्यामध्ये विविध कृषी व लघुउद्योग बचत गट तसेच इतर जे प्रदर्शन होतात त्यामध्ये स्टॉल लावून त्यांनी बनवलेल्या धूप विक्री करतात. तसेच त्यांच्या तालुक्याच्या परिसरात देखील किराणा दुकानांच्या माध्यमातून त्यांनी बनवलेले धूप विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जातो.

ते दोन वेगवेगळ्या आकारांमध्ये धूप निर्मिती करतात. या धुपला सुगंध यावा यासाठी त्यामध्ये मोगरा, गुलाब तसेच ग्लोरी, चंदन, लव्हेंडर आणि रोलेक्सचा वापर करून सुगंधित धूप बनवतात.

तसेच धूपची मागणी व विक्रीत वाढ झाल्यामुळे शोभाबाई शिंदे यांनी दहा महिलांना सोबत घेऊन जय हनुमान महिला स्वयंसहायता समूह गटाची स्थापना केली व मागणीचा विचार करता या बचत गटांच्या महिलांना एकत्रित करून महिन्यातून एक किंवा दोनदा धूप निर्मिती केली जाते.

 धूप निर्मितीतून किती आर्थिक उत्पन्न मिळते?

 ते जे काही धूपची निर्मिती करतात त्याची  ते 30, 50 आणि 100 ग्रॅम अशा पॅकिंगमध्ये धूप कांड्या विक्रीसाठी पाठवतात. पंधरा रुपयापासून त्याची विक्री होते व खर्च वजा जाता महिन्याला शिंदे दांपत्य तीस ते पस्तीस हजार रुपयांचे उत्पन्न या माध्यमातून मिळवतात.