घरच्या घरी तयार करा तणनाशक आणि करा नायनाट शेतातील तणांचा! वाचेल खर्च व होईल फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकंदरीत आपण पिकांचा होणारा उत्पादन खर्च पाहिला तर यामध्ये प्रामुख्याने आंतरमशागतीवर जो काही खर्च होतो तो सगळ्यात जास्त असतो. पिकांच्या अंतर मशागतीमध्ये महत्त्वाचे म्हणजे जमिनीची मशागत आणि प्रामुख्याने तणांचा बंदोबस्त करण्याकरिता जास्त प्रमाणावर खर्च करायला लागतो. त्यामध्ये कोळपणी तसेच निंदणी यावर जास्त खर्च होत असतो. तणांचा बंदोबस्त करण्याकरता आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या रासायनिक तणनाशक आले असल्यामुळे शेतकरी आता तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात.

परंतु तणनाशक पिकांमध्ये फवारताना त्या प्रमाणात काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे असते. तसेच तणनाशकांची किंमत जास्त असल्यामुळे खर्च देखील वाढतो आणि बऱ्याचदा तणनाशकांचा हवा तेवढा फायदा होताना दिसून येत नाही. याचा अनुषंगाने आपण या लेखांमध्ये एक असे साधे तणनाशक सांगणार आहोत जे तुम्ही तुमच्या घरी तयार करू शकता.

 घरच्या घरी अशा पद्धतीने तयार करा तणनाशक

याकरिता तुम्हाला मीठ आणि युरिया यांचा वापर करणे गरजेचे आहे. मीठ आणि युरियाच्या वापरामुळे तन झटपट नष्ट होऊ शकते. तसेच तणनाशक खरेदी करण्यावरचा खर्चात देखील तुम्ही बचत करू शकतात. समजा तुमच्याकडे जर 15 लिटरचा फवारणी पंप असेल तर त्याकरिता तुम्हाला तीनशे ग्रॅम मीठ घेणे गरजेचे आहे.

प्रामुख्याने जाड मिठाचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच यामध्ये मुठभर युरिया म्हणजेच दीडशे ग्रॅम युरिया टाकणे गरजेचे आहे. त्यानंतर हे मिश्रण तयार करून ते 15 लिटर पंपासाठी वापरायचे आहे. त्यानंतर त्याची फवारणी तुम्ही करू शकतात. अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे मिश्रण तयार होते व वेळेत देखील बचत होते.

 हे तणनाशक फवारताना ही काळजी घ्यावी

शक्यतो पेरणी करण्याआधीच या तणनाशकाचा वापर करावा. आधी बांधावरच्या तणांवर याचा वापर करून पहावा. तसेच पुरेपूर काळजी देखील घ्यावी. महत्त्वाचे म्हणजे यासाठी फक्त खडा मीठचाच वापर करावा.