Auction of old iPhones: 15 वर्षे जुना आयफोन लिलावात विकला गेला सुमारे 32 लाख रुपयांना, काय विशेष आहे त्या फोनमध्ये? जाणून घ्या……

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Auction of old iPhones: आयफोन (iPhone) आणि अॅपलच्या (apple) इतर उत्पादनांची लोकांची क्रेझ सर्वश्रुत आहे. विशेषत: आयफोनच्या बाबतीत, लोकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. जर तुम्ही आयफोन खरेदी करणार असाल तर तुम्ही कोणता आयफोन घ्याल? बहुतेक लोकांची पसंती लेटेस्ट आयफोन असेल. नुकताच एका जुन्या आयफोनचा लिलाव (auction of old iphone) करण्यात आला आहे.

हा सामान्य iPhone नव्हता. तर हा पहिला आयफोन होता, ज्याचा बॉक्स अद्याप उघडला गेला नव्हता. म्हणजेच हे डिव्हाईस 2007 साली लाँच झालेला आयफोन आहे. या उपकरणाचा लिलाव करण्यात आला आहे, जिथे ते अनेक पटींनी जास्त किंमतीला विकले गेले आहे.

लिलाव किती रुपयांत झाला?

2007 मध्ये, हे डिव्हाइस $ 599 (सध्याच्या दरानुसार सुमारे 50 हजार रुपये) किंमतीला लॉन्च करण्यात आले होते. मात्र, त्याचा $39,339 (सुमारे 32,34,000 रुपये) लिलाव झाला आहे. 8GB स्टोरेज असलेल्या या व्हेरियंटचा LCG ऑक्शनने लिलाव केला आहे.

लॉन्चच्या 15 वर्षांनंतर, हा स्मार्टफोन त्यावेळच्या किमतीपेक्षा 65 पट अधिक किमतीत विकला गेला आहे. रिपोर्ट्सनुसार, या आयफोनचा लिलाव $2500 पासून सुरु झाला. दोन दिवसात फक्त $10,000 पोहोचले. लिलावाच्या शेवटच्या दिवशी त्याच्या किमती वाढल्या आहेत आणि हे उपकरण $ 39,339.60 मध्ये विकले गेले.

अॅपलच्या अनेक उपकरणांचा लिलाव आधीच झाला आहे –

अॅपलच्या उत्पादनाचा लिलाव (Apple product auction) होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला देखील 2007 मध्ये लॉन्च केलेल्या आयफोनच्या न उघडलेल्या युनिटचा $35,000 मध्ये लिलाव करण्यात आला होता. या उत्पादनाचा आरआर ऑक्शनने लिलाव केला होता. याशिवाय अॅपल-1 सर्किटचाही लिलाव करण्यात आला, जो अॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह ‘वोझ’ वोझ्नियाक (Woz’ Wozniak) यांनी सोल्डर केला होता.

त्याचा लिलाव $677,196 मध्ये झाला. अॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांनी 9 जानेवारी 2007 रोजी पहिला आयफोन लॉन्च केला. पहिला आयफोन टचस्क्रीन, कॅमेरा आणि वेब ब्राउझिंगसह आला. सुमारे 5 महिन्यांनंतर त्याची विक्री सुरू झाली. हे उत्पादन स्मार्टफोन मार्केटसाठी गेम चेंजर ठरले.