राज ठाकरेंच्या सभेला उरले काही तास, सभेला विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज, भाषणात हे मुद्दे मांडणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

औरंगाबाद : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांची आज औरंगाबाद (Aurangabad) सभा होणार असून अनेकांना राज यांच्या भाषणाची उत्सुकता लागली आहे. या सभेला विक्रमी गर्दी होण्याचा अनेकांनी अंदाजही व्यक्त केला आहे.

या सभेत भोंगे आणि हिंदुत्वावरून राज ठाकरे आपल्या आक्रमक शैलीत भूमिका मांडण्याची शक्यता आहे. औरंगाबादला सभेला जाण्यापुर्वी त्यांनी पुण्यात काही ठिकाणी भेटी दिल्या आहेत. तर काल औरंगाबादमध्ये सुध्दा काही महत्त्वाच्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत.

मनसेचे मोठे नेते औरंगाबादमध्ये दाखल झाले असून औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या (Marathwada Sanskritik Mandal) मैदानावर आजची ऐतिहासिक सभा असेल, असा दावा मनसेकडून (MNS) करण्यात येत आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेवरील (Shivsena) नाराजी कॅश करण्यासाठी राज ठाकरेंनी हिंदुत्वाचं शस्त्र हाती घेतलं असून मुंबई, ठाणे, पुण्यानंतर थेट औरंगाबदमध्ये सभा भरवली आहे. औरंगाबादच्या आजच्या सभेत राज ठाकरे कोणत्या विषयावर बोलतील, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

– मस्जिदिवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात राज ठाकरे आक्रमक बोलू शकतील.
– मस्जिदिवरील भोंग्यांबाबत दिलेल्या अलटीमेटम बाबत निर्णायक भूमिका जाहीर करू शकतील.
– औरंगाबादनंतर राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. त्याबाबत भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
– हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल आक्रमक भूमिका घेतील.
– औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याबाबत बोलण्याची शक्यता आहे.
– औरंगाबाद शहरातील एमआयएमच्या वाढत्या ताकतीबद्दलबद्दल राज ठाकरे टीकेची झोड उठवणार
– औरंगाबाद शहराच्या विकासाबद्दल शिवसेनेवर हल्लाबोल करणार
– औरंगाबाद शिवसेनेचा गड आहे की नाही याबाबत तुफान टीका करणार
– इम्तियाज जलील यांच्या इफ्तार पार्टीच्या निमंत्रणाचा समाचार घेण्याची शक्यता आहे.
– हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडणार