Airtel Prepaid Plan : एअरटेलचा धमाका! मोफत OTT सब्सक्रिप्शन आणि 2.5GB डेटासह संपूर्ण वर्षभर चालतो हा प्लॅन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Airtel Prepaid Plan : जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दोन खास रिचार्ज प्लॅन आणले आहेत, ज्याची वैधता एका वर्षाची आहे. म्हणजेच तुम्हाला एकदाच रिचार्ज करावा लागणार आहे.

याच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला एका वर्षासाठी Amazon Prime Video च्या मोबाईल एडिशनचे फ्री सब्सक्रिप्शन आणि डिस्ने हॉटस्टारचा मोफत प्रवेश मिळेल. तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

एअरटेल आता आपल्या ग्राहकांना 3,359 रुपयांचा रिचार्ज प्लॅन देत असून या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 365 दिवसांची वैधता, दैनिक डेटा, अनलिमिटेड कॉल्स उपलब्ध करून देण्यात आला आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

एअरटेलचा हा प्लॅन एकूण 365 दिवस म्हणजेच संपूर्ण वर्षभर चालतो. तुम्हाला एकदाच रिचार्ज करावा लागणार आहे. यात कंपनीकडून इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 2.5 जीबी डेटा दिला जात आहे. तसेच तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

हा प्लॅन तुमच्या मनोरंजनासाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला एक वर्षासाठी Amazon Prime Video च्या मोबाईल एडिशनचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. इतकंच नाही तर प्लॅनच्या ग्राहकांना एका वर्षासाठी डिस्ने हॉटस्टारचा मोफत प्रवेश दिला जात आहे.

समजा एअरटेलचा 3359 रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुम्हाला महाग वाटत असल्यास तर तुम्ही कंपनीचा 999 रुपयांचा प्लॅन घेऊ शकता. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज २.५ जीबी डेटा देत असून हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. त्याशिवाय यात तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध करून दिले आहे.

ग्राहकांना या प्लॅनमध्ये कंपनीकडून तीन महिन्यांसाठी डिस्ने हॉटस्टार मोबाईलचे फ्री सब्सक्रिप्शन देण्यात येत आहे. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये Amazon प्राइम मेंबरशिप मिळत आहे. एअरटेलचे या दोन्ही प्लॅनमध्ये विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन देण्यात येत आहे.