Mosquito Preventions: डेंग्यू आणि मलेरिया पसरवणाऱ्या डासांपासून सावधान! या 5 नैसर्गिक गोष्टीने मिळू शकते डासांपासून सुटका….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mosquito Preventions: पावसाळ्यानंतर डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. डासांच्या विषारी डंकामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो. पावसाळ्यात पसरणाऱ्या डासांमुळे झिका विषाणू (zika virus), मलेरिया (malaria), चिकनगुनिया आणि डेंग्यूसारखे आजार होऊ शकतात. डासांचा सामना करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. परंतु जर तुम्हाला हवे असेल तर या गोष्टींवर पैसे खर्च करण्याऐवजी तुम्ही घरात असलेल्या नैसर्गिक गोष्टींने आणू शकता डासांवर प्रतिबंध (mosquito prevention).

स्वयंपाकघरातील कपाटात ठेवा कापूर –

वॉशरूम, किचन किंवा कपाटात ठेवलेल्या कापूरच्या (camphor) वासामुळे डास घराबाहेर पडू शकतात. खोलीच्या आत किंवा बाल्कनीच्या कोपऱ्यात कुठेही लहान भांड्यात कापूर ठेवा. साधारण 30 मिनिटांत कापूरचा वास घरभर पसरेल आणि तिथे डास येणार नाहीत.

नॅचरल स्प्रे ऑफ लसण –

भाज्यांमध्ये जेवणाची चव वाढवणारा लसूण (garlic) नैसर्गिक स्प्रे म्हणूनही तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. यासाठी लसूण पाण्यात उकळा. त्यानंतर हे पाणी एका बाटलीत भरून स्प्रेप्रमाणे घराच्या कानाकोपऱ्यात फवारावे. असे केल्याने डास पळून जातील.

कॉफीने डासांचा नायनाट करा –

कोणत्याही व्यक्तीच्या घरात कॉफी असतेच. तुम्हाला माहित आहे का की कॉफीच्या (coffee) वापराने आजार पसरवणाऱ्या या डासांपासून सुटका होऊ शकते. डास बहुधा एकाच ठिकाणी साचणाऱ्या घाणेरड्या पाण्यात प्रजनन करतात. या पाण्यात थोडी कॉफी टाकून डासांपासून आराम मिळतो.

लॅव्हेंडर ऑइलची फवारणी –

लॅव्हेंडर तेलाच्या सुगंधासमोर डासांना जगणे कठीण जाते. तुमच्या आजूबाजूला किंवा घरात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी लॅव्हेंडर ऑइलची फवारणी करा. तुम्हाला हवे असल्यास हे सुगंधी तेल तुम्ही तुमच्या हातांवर आणि पायाला क्रीम म्हणून वापरू शकता.

पेपरमिंट ऑइल –

पुदिन्याच्या वासानेही डास दूर होऊ शकतात. यासाठी तुम्ही पुदिन्याच्या तेलाची एक कुपी तुमच्या आजूबाजूला ठेवू शकता. डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घराच्या बाल्कनीमध्ये पुदिन्याचे रोप देखील ठेवू शकता.