Bhau Beej : जाणून घ्या, भाऊबीजेला औक्षण करताना भावाचे तोंड कोणत्या दिशेला असावे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhau Beej : बहीण आणि भावाच्या नात्याचा धागा दृढ करणारा दिवस म्हणजे भाऊबीज. दरवर्षी दिवाळीच्या सणाची वसुबारसेपासून (Vasubaras) सुरू झालेल्या भाऊबीजेला सांगता होते. यावर्षी हा सण 26 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे.

भाऊबीज शुभ मुहूर्त

भाऊबीज 2022 तारीख (Bhau Beej 2022 Date) – 26 ऑक्टोबर, बुधवार

भाऊबीज मुहूर्त (Bhau Beej 2022)- 13:10 ते 15:22

बहिणींनी भावाचे तिलक या दिशेला तोंड करून करावे.

भावाचे तिलक करताना बहिणींनी दिशा (Direction) लक्षात ठेवावी. बहीण भावाचे तिलक करते तेव्हा भावाचे तोंड उत्तर किंवा वायव्य दिशेला असावे. दुसरीकडे, बहिणीने आपले तोंड ईशान्य किंवा पूर्व दिशेला ठेवावे.

भाऊबीजेला तिलक करण्याची पद्धत-

  • या दिवशी सर्वप्रथम गणेशपूजा (Ganesha Puja) करावी.
  • शुभ मुहूर्तावर ज्या ठिकाणी तिलक लावण्यासाठी बसायचे आहे त्या ठिकाणी रांगोळीचा छोटा चौकोन बनवा.
  • रोळी, अक्षत, दीपक, मिठाई आणि गोळा इत्यादींनी भाऊबीजेची थाळी तयारी करा.
  • आता ज्या ठिकाणी रांगोळी काढली आहे, त्या ठिकाणी उजवीकडे पाट टाकून भावाचे तिलक करावे.
  • यानंतर भावाला मिठाई खायला द्या.