Business Idea : सोडू नका अशी संधी! 4 तास काम करून महिन्याला मिळवा 60 ते 70 हजार रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : अलीकडच्या काळात नोकरी मिळवणे आणि ती टिकवणे खूप जिकरीचे काम बनले आहे. अनेक दिग्ग्ज कंपन्या आपल्या कामगारांना नोकरीवरून काढून टाकत आहेत. त्यामुळे देशातील बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता महिन्याला सहज 60 ते 70 हजार रुपये कमावू शकता. तुम्ही आता ऑनलाइन कंपनीमध्ये काम करू शकता. कसे ते जाणून घ्या.

डिलिव्हरी बॉयला कंपनीच्या गोदामातून पॅकेजेस घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम असते. आज, Amazon ची सर्व प्रमुख शहरांमध्ये केंद्रे असून देशाची राजधानी दिल्लीत Amazon ची 18 केंद्रे उपलब्ध आहेत.

किती तास करावे लागेल काम?

समजा आपण कामाच्या तासांबद्दल बोलायचे झाले तर ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती तासांमध्ये किती पॅकेज वितरित करू शकता. साधारणपणे एक डिलिव्हरी बॉय एका दिवसात एकूण 4 तासात 100 ते 150 पॅकेट वितरित करत असतो.

बाईक आणि ड्रायव्हिंग लायसन्स गरजेचे

हे लक्षात घ्या की डिलिव्हरी करण्यासाठी तुमच्याकडे स्वतःची बाईक किंवा स्कूटर असावी. इतकेच नाही तर बाईक किंवा स्कूटरचा विमा आणि आरसी वैध असावी. अर्जदाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स देखील असावे. डिलिव्हरी संबंधित संपूर्ण प्रशिक्षण कंपनीकडून देण्यात येते.

किती असतो पगार?

पगाराबद्दल बोलायचे झाले तर Amazon मध्ये डिलिव्हरी बॉईजना 12 ते 15 हजार रुपये पगार दिला जातो. पेट्रोलचा खर्च तुमचा असून तुम्हाला एक उत्पादन किंवा पॅकेट वितरित करण्यासाठी 10 ते 15 रुपये दिले जातात. समजा कोणी महिनाभर काम केले आणि दररोज 100 पॅकेट वितरित केल्यास तर तो प्रत्येक महिन्याला 60,000 रुपये सहज कमवू शकतो.

असा करा अर्ज

समजा तुम्हाला डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास तर तुम्हाला थेट कंपनीच्या साइटवर जाऊन अर्ज करता येईल.