Electric Car : सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार! प्रीमियम फीचर्स आणि शक्तिशाली इंजिनसह 4 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा ही कार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric Car : बाजारात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. या कारमध्ये तुम्हाला प्रीमियम फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन पाहायला मिळेल. अनेक कंपन्या बाजारात आपल्या कार लाँच करू लागल्या आहेत. जर तुम्हीही इलेक्ट्रिक कार खरेदी करणार असाल तर जरा थांबा.

कारण बाजारात आता लवकरच बजाजची इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहे. या कारमध्ये तुम्हाला शानदार फीचर्स पाहायला मिळतील. किमतीचा विचार केला तर कंपनीची कार 4 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्हाला खरेदी करता येईल.

Bajaj Qute

बजाज या कंपनीने जानेवारी 2023 मध्ये आपल्या नवीन Bajaj Qute ला सरकारकडून मंजुरी घेतली असून या कारचे वजन 451 किलो इतके असेल. मेट्रो शहरातील अरुंद गल्ल्या आणि गर्दीच्या ठिकाणी ही कार चालवणे सोपे होईल. कंपनीने 2018 मध्ये 2.48 लाख रुपये एक्स-शोरूममध्ये सादर करण्यात आले होते. किमतीचा विचार केला तर असा अंदाज आहे की नवीन Qute (RE60) 3.61 लाख एक्स-शोरूममध्ये उपलब्ध होऊ शकते.

70 किमी/ताशी टॉप स्पीड

हे लक्षात ठेवा की ही 4 सीटर कार असणार आहे. यात स्थिर छत, आरामदायी सस्पेंशन आणि 70 किमी/ताशी टॉप स्पीड असणारा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारमध्ये 12.8 bhp पॉवर दिली जाईल. ही कार CNG मध्ये देखील दिली जाऊ शकते. या कारला सरकत्या खिडक्या असणार आहेत. या कारमध्ये कंपनीकडून 216 सीसी सिंगल सिलेंडर हाय पॉवर इंजिन दिले जाईल.

16.1 Nm टॉर्क

कंपनीच्या नवीन कारला 16.1 Nm टॉर्क मिळेल. ही कंपनीची 5-स्पीड कार असून यात रिव्हर्स गिअरसह ‘एच’ पॅटर्न गिअरबॉक्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. या स्मार्ट कारला 20 लीटर बूट स्पेस मिळेल. बाजारात या कारची स्पर्धा थेट मारुती अल्टोशी असणार आहे.

6 मोनोटोन रंग पर्याय

बाजारात मारुती अल्टो K10 चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे Std (O), LXi, VXi आणि VXi. किमतीचा विचार केला तर ही कार एक्स-शोरूम 3.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत तुम्हाला ही कार खरेदी करता येईल. या मस्त कारमध्ये 6 मोनोटोन कलर पर्याय देण्यात आले आहेत. ही कार 24.9 kmpl पर्यंत मायलेज देते. तर कारमध्ये 214 लीटरची बूट स्पेस असून मारुती अल्टो K10 मध्ये 65.71 Bhp पॉवर आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारात या कारला सर्वात जास्त मागणी आहे.