OnePlus : अखेर ठरलं! वनप्लस ‘या’ दिवशी लॉन्च करणार सर्वात स्वस्त 5G फोन, जाणून घ्या किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus : अनेकांना वनप्लसचा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असते. परंतु, बजेट कमी असल्यामुळे स्मार्टफोन खरेदी करता येत नाही. परंतु आता याच स्मार्टफोनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण त्यांना सर्वात स्वस्त स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा 5G स्मार्टफोन असणार आहे. इतकेच नाही तर या कंपनीने कंपनीने स्वतः लॉन्च तारखेची पुष्टी केली आहे. एक कार्यक्रमादरम्यान कंपनी हे स्मार्टफोन लाँच करणार आहे. या दोन नवीन स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स काय असणार जाणून घ्या.

कंपनीने याबाबत अधिकृतपणे घोषित केले असून 4 एप्रिल रोजी होणाऱ्या ‘लार्जर दॅन लाइफ – ए वनप्लस नॉर्ड लॉन्च इव्हेंट’मध्ये दोन परवडणारी उपकरणे भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात येणार आहे. या इव्हेंटमध्ये, कंपनी OnePlus Nord CE 3 Lite 5G आणि OnePlus Nord Buds 2 चे अनावरण करणार आहे. असा दावा केला जात आहे की नवीन नॉर्ड मॉडेलसह, वापरकर्त्यांना वेगवान आणि सहज अनुभव मिळणार आहे. Nord CE 2 Lite 5G चा उत्तराधिकारी म्हणून नवीन फोन बाजारात लाँच करण्यात येईल.

असणार ‘ऑनलाइन-ओन्ली’ कार्यक्रम

याबाबत कंपनीने असे सांगितले आहे की 4 एप्रिल रोजी होणारा कार्यक्रम हा ‘ऑनलाइन-ओन्ली’ कार्यक्रम असणार आहे. इव्हेंट टीझरमध्ये डिवाइसचा नवीन पेस्टल लाइम कलर दाखवला आहे, तसेच ड्युअल-सर्कल कॅमेरा कटआउट दिसला आहे. OnePlus Nord Buds 2 मानक प्रीमियम ऑडिओ इअरबड्सच्या तुलनेत परवडणाऱ्या किमतीत लॉन्च करण्यात येईल. कंपनी त्यांना स्पेकल्ड ब्लॅक कलर आणि प्रीमियम डिझाइनसह लॉन्च केला जाऊ शकतो.

https://twitter.com/OnePlus_IN/status/1638844460204269569?s=20

कशी असणार स्पेसिफिकेशन

मागील लीकमध्ये असे सुचवले आहे की कंपनीच्या नवीन बजेट फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसाठी समर्थनासह 6.7-इंच फुल एचडी + एलसीडी डिस्प्ले असणार आहे. या स्मार्टफोनला ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर मिळू शकतो तसेच तो Android 13 वर आधारित OxygenOS 13 सॉफ्टवेअर स्किन उपलब्ध असणार आहे. ऑथेंटिकेशनसाठी कंपनीच्या या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात येईल.

याच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास या नवीन परवडणाऱ्या स्मार्टफोनमध्ये, वापरकर्त्यांना 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर व्यतिरिक्त 108MP प्राथमिक कॅमेरा सेटअप मागील पॅनलवरील दोन मोठ्या रिंगमध्ये दिले जाणार आहेत.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल. कंपनीच्या या स्मार्टफोनला 5000mAh क्षमतेची बॅटरी मिळू शकते, ज्याला 67W SuperVOOC जलद चार्जिंगसाठी समर्थन दिले जाईल. नवीन स्मार्टफोनची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.