वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पाच टिप्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- जादा वजन हृदयरोग, डायबिटीस, स्ट्रोक व काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरचे मुख्य कारण आहे. अशा वेळी वजन नियंत्रित करणे खूप आवश्यक आहे.

वेट मॅनेजमेंट प्रोग्रामनुसार सुरक्षित पद्धतीने एक महिन्यात ३ किलोपर्यंत वजन प्रभावीपणे कमी करता येऊ शकते. अमेरिकेचे सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेशनही याची पुष्टी करते. सायन्सआधारित या पाच पद्धती अवलंबून वजन कमी करू शकता.

१. नाश्त्यात घ्या हायप्रोटीन; ६०% कमी होईल जेक्णाची इच्छा:- यूएस नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थम क ध्ये प्रकाशित शोधानुसार डव कार्बोहायड्रेटच्या तुलनेत प्रोटीन मेटाबोलाइज करण्यासाठी शरीराला जास्त कॅलरी खर्च करावी लागते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनचा शोध सांगतो की, दिवसभरात घेतल्या जाणाऱ्या एकूण कॅलरीत जर प्रोटीनचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत वाढवले तर भूक ६0% कमी होते, ज्यामुळे कॅलरी इंटेक घटते.

२. सावकाश खा :- भराभर खाल्ल्यास जास्त कॅलरी घेतली जाते. भूक नियंत्रित नसते. हेल्थलाइन या आरोग्यपत्रिकेनुसार अन्न पचवणारे हार्मोन प्रेलिन व भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोनचे सिम्नल मेंदूपर्यंत पोहोचायला वीस मिनिटे लागतात. अशा वेळी भराभर खाल्ल्यास मेंदूपर्यंत सिग्नल पोहोचेपर्यंत आपण जास्त कॅलरी घ्याल.

३. उत्तम झोप घ्या.:-  कमी झोपेने भूक कमी करणारे हार्मोन घटून भूक वाढते. झोप कमी झाल्यास भूक कमी करणाऱ्या लेप्टिन हार्मोनचा स्राव कमी होतो. तेच अन्न पचवणारे हार्मोन घ्रेलिन वाढते. कोलरेडो विद्यापीठानुसार, जर एखादी व्यक्ती फक्त एक आठवडा पाच तासांचीच झोप घेत असेल, तर तिचे वजन एक किलोपर्यंत वाढू शकते.

४. शुजरी डिक व फ्रूट ज्यूस टाळा:- २ किलोपर्यंत वजन वाढवू शकते रोज फक्त एक साखरी ड्रंक हार्वर्ड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थनुसार शुगरी ड्रिंक आणि गोड फ्रूट ज्यूस वजन नियंत्रित करण्याचे तंत्र बाधित करते. जर रोज सोडा, कोला, फ्रूट पंच, एनर्जी ड्रिंक इ. पैकी एक पेयही प्याले व त्या प्रमाणात इतर जेवणात कॅलरीत कपात केली नाही तर वर्षभरात सुमारे २ किलो वजन वाढू शकते.

५. डाळी, पालेभाज्या व नट्स वजन घटवतात:- वेब एमडी नुसार डाळी व बीन्स, प्रोटीन व फायबरचे उत्तम खोत आहेत. यामुळे कॅलरी इंटेक कमी होते. तसेच पालेभाज्यांत हाय फायबर व लो कॅलरी असते, ज्यामुळे भुकेची जाणीव कमी होते. वजन कमी करण्यास मदत मिळते. नट्समध्ये प्रोटीनसोबत विविध पौष्टिक घटकही असतात जे वजन नियंत्रित करण्यास मदत करतात.