Gold Price Today : ग्राहकांसाठी सुवर्णसंधी ! सोन्याच्या किमती पुन्हा घसरल्या, जाणून घ्या नवीनतम दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : सोने आणि चांदी खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत संकेतांच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा एकदा कमी झाल्या आहेत.

त्यामुळे सोने आणि चांदी खरेदीदारांना कमी किमतीत दागिने खरेदी करता येतील. दरम्यान आज कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिम्मित बाजारपेठ बंद असणार आहेत. त्यामुळे आज सोने आणि चांदीच्या किमती जाहीर होणार नाहीत. उद्याच या किमती जाहीर केल्या जाणार आहे.

तुम्ही आता आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा सोने 700 रुपये प्रति 10 ग्रॅम तसेच चांदी सुमारे 6100 रुपये प्रति किलोने स्वस्त खरेदी करू शकता. सध्या सोने 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 74,000 रुपये प्रति किलोने विकण्यात येत आहे.

मंगळवारी जाहीर होणार नवीन दर

हे लक्षात घ्या की इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन केंद्र सरकारने जाहीर करण्यात आलेल्या सुट्ट्या वगळता शनिवार आणि रविवारी दर जारी करत नाही. तसेच आज कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीमुळे बाजारपेठ बंद असणार आहेत. म्हणजेच सराफा बाजारात तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोने आणि चांदीचे नवीन दर मंगळवारी 2 मे रोजी जाहीर केले जाणार आहेत.

शुक्रवारी हे होते दर

मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने प्रति 10 ग्रॅम 347 रुपयांनी स्वस्त होऊन 60168 रुपये प्रति किलोवर बंद झाले होते. तर त्यापूर्वी गुरुवारी सोने प्रति 10 ग्रॅम 84 रुपयांनी महाग होऊन 60515 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले होते.

शुक्रवारी फक्त सोनेच नाही तर चांदीच्या दरातही घसरण झाली. शुक्रवारी चांदीचा भाव 547 रुपयांनी घसरून 73868 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. तर गुरुवारी चांदी 215 रुपयांनी महाग होऊन 74415 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचे दर

यानंतर 24 कॅरेट सोने 347 रुपयांनी स्वस्त होऊन 60168 रुपयांवर, 23 कॅरेट सोने 346 रुपयांनी स्वस्त होऊन 59927 रुपयांवर, 22 कॅरेट सोने 288 रुपयांनी स्वस्त होऊन 55114 रुपयांवर, 18 कॅरेट सोने 260 रुपयांनी स्वस्त होऊन 45126 रुपये झाले आहे. तर 14 कॅरेट सोने 203 रुपयांनी स्वस्त झाले असून 35198 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. MCX आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने आणि चांदीचे दर करमुक्त असल्याने आपल्याला देशातील बाजारातील दरांमध्ये तफावत दिसत आहे.

सोने-चांदी पुन्हा स्वस्त

सोन्याची विक्री आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 712 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त केली जात आहे. 13 एप्रिल 2023 रोजी सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून त्या दिवशी सोन्याचा भाव 60880 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला होता. तसेच चांदी आजही 6112 रुपये प्रति किलो दराने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा स्वस्त असून चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो इतका आहे.

सर्वात शुद्ध सोने

24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध मानले जाते, मात्र या सोन्यापासून दागिने बनवले जात नाहीत कारण ते खूप मऊ असतात. त्यामुळे दागिने बनवण्यासाठी अनेकजण 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. 24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. तसेच 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने बनवण्यात येतात, तर 24 कॅरेट मऊ असल्याने त्यापासून दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे अनेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोन्याची विक्री करतात.

हॉलमार्क पाहून करा खरेदी

सोने खरेदी करत असताना ग्राहकांनी त्याच्या गुणवत्तेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे सोन्याचे दागिने हॉलमार्क पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी असून ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ही भारतातील एकमेव एजन्सी आहे जी हॉलमार्क ठरवत असते. हॉलमार्किंग योजना भारतीय मानक ब्युरो अंतर्गत नियम आणि विनियमांद्वारे नियंत्रित करण्यात येते.

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO द्वारे हॉल मार्क्स देण्यात येतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात.

22 आणि 24 कॅरेट सोन्यातील फरक पहा

हे लक्षात घ्या की 24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार करण्यात येतात. तर 24 कॅरेट सोने खूप मऊ असल्याने त्यापासून दागिने बनवता येत नाही. त्यामुळे अनेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोन्याची विक्री करतात.