Redmi Note 12 : स्मार्टफोनप्रेमींसाठी गुडन्यूज! अखेर लाँच झाले रेडमीचे 3 जबरदस्त स्मार्टफोन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Redmi Note 12 : रेडमी ही भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन्स कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने नवीन वर्षात आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. कंपनीने Redmi Note 12 सीरीजचे तीन मॉडेल भारतात लाँच केले आहेत.

यामध्ये Redmi Note 12, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ या तीन स्मार्टफोन्सचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे 5G असणारे स्मार्टफोन्स आहेत.

लॉंच झाली रेडमीची नवीन सीरिज

रेडमीने आपल्या लॉन्च इव्हेंटमध्ये Redmi Note 12 सीरीज लॉन्च केली आहे. कंपनीने आपल्या http://Mi.com या प्लॅटफॉर्मवर आणि कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर हा इव्हेंट आयोजित करून आपला नवीनतम फोन सादर केला आहे. तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून Redmi Note 12 सीरिज खरेदी करता येणार आहे.

Redmi Note 12 Pro स्पेसिफिकेशन

Redmi Note 12 Pro मध्ये कंपनीने 6.67-इंचाचा HDR10+ FHD+ OLED डिस्प्ले 20:9 आस्पेक्ट रेशो, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2400 X 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह आहे. फोन MediaTek Dimensity 1080 SoC द्वारे समर्थित आहे, जो Android 12 आउट-ऑफ-द-बॉक्स वर आधारित MIUI 13 कस्टम स्किन चालवतो.

कॅमेरा आणि बॅटरीच्या बाबत बोलायचे झाले तर, यात ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा सोनी IMX766 प्राथमिक कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा कंपनीने दिला आहे. त्याच्या फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. याला 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरीचा सपोर्ट आहे.

Redmi Note 12 Pro Plus स्पेसिफिकेशन

Redmi Note 12 Pro Plus मध्ये कंपनीने 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.67-इंच फुल-एचडी OLED डिस्प्ले आहे. हा फोन MediaTek Dimensity 1080 SoC द्वारे समर्थित आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 200-मेगापिक्सलचा OIS सेन्सर, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर दिला आहे. यात 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोन 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी पॅक करतो.

किंमत

कंपनीने अद्याप किंमत जाहीर केलेली नाही. तरीही Redmi Note 12 Pro Plus च्या 6GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत 24,999 रुपये तर त्याच्या 8GB RAM + 256 ची किंमत 26,999 रुपये असू शकते. तसेच 12GB + 256GB स्टोरेजची किंमत 28,999 रुपये असू शकते.