Health Marathi News : उच्च रक्तदाबावर ‘या’ ४ गोष्टी ठेवतील नियंत्रण; उन्हाळ्यात सेवन केल्याने होतील फायदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Marathi News : उच्च रक्तदाबावर ( High blood pressure) वेळीच नियंत्रण ठेवावे लागते. नाहीतर भयंकर आजारांना किंवा त्रासाला सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाबावर नियंत्रण (Control) ठेवायचे असेल तर उन्हाळ्यात काही घरगुती उपाय आहेत ते करून पहा.

रक्तदाबावर योग्य वेळी उपचार न केल्यास ते आरोग्यासाठी (Health) धोकादायक ठरू शकते. डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा आणि सुस्त वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, छातीत दुखणे,

जलद श्वास घेणे किंवा धाप लागणे आणि अंधुक दृष्टी ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत. त्यामुळे हृदयविकाराचा (Heart attack) धोका  वाढतो.

तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करून, सकस आहाराचे सेवन करून उच्च रक्तदाब कमी करू शकता.किवी व्यतिरिक्त अशी ४ फळे आहेत, ज्यांच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.

1. किवी हृदयासाठी आरोग्यदायी आहे

किवी पचनक्रियेपासून प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. किवी खाल्ल्याने तुम्ही हायपरटेन्शनच्या समस्येवर नियंत्रण ठेवू शकता.

विशेष म्हणजे किवीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवतात. दररोज दोन ते तीन किवीचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब, पक्षाघात, हृदयविकाराचा झटका यासारख्या समस्या टाळता येतात.

2. टरबूज उच्च रक्तदाब प्रतिबंधित करते

टरबूजमध्ये भरपूर पाणी असते, जे आपल्याला आतून ताजे, थंड आणि हायड्रेट ठेवते. या फळामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. टरबूजमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रित करते.

3. केळ्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो

पोटॅशियममुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केळी हे असेच एक फळ आहे, ज्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. या दृष्टीने केळी खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या टाळता येते.

4. उच्च रक्तदाबाची समस्या आंब्याने दूर होईल

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी आंब्याचे सेवन जरूर करावे. आंब्यामध्ये पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी एक आदर्श फळ आहे. मँगो शेक, स्मूदी, फ्रूट चार्ट किंवा कट करूनही मँगो खाऊ शकता.