Hyundai Exter : टाटा पंचला टक्कर देण्यासाठी येतेय 6 एअरबॅग्स आणि पॉवरफुल इंजिन असणारी ह्युंदायची आगामी कार, जाणून घ्या किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hyundai Exter : ह्युंदाई मोटर्स सतत मार्केटमध्ये नवनवीन कार लाँच करत असते. अशातच कंपनी मागील काही दिवसांपासून आपल्या आगामी कारवर म्हणजे Exter वर काम करत आहे. लवकरच ही कार तुम्हाला मार्केटमध्ये धुमाकूळ घालताना दिसेल.

कंपनी आपल्या आगामी कारमध्ये सर्वोत्तम फीचर्स तसेच पॉवरफुल इंजिन देईल. इतकेच नाही तर कंपनीकडून यात 6 एअरबॅग्स देण्याची शक्यता आहे. लाँच झाल्यानंतर कंपनीची ही कार टाटा पंचला थेट टक्कर देऊ शकते.

मिळणार ही सेफ्टी फीचर्स

या कारमधील 6 एअरबॅग्ज शिवाय, सर्व प्रकारांमध्ये 26 सेफ्टी फीचर्स मिळणार आहेत. यात ईएससी, व्हीएसएम आणि हिल क्लाइंब असिस्ट फंक्शन सारख्या फीचर्सचा समावेश आहे. इतकंच नाही तर, Hyundai Xtor मध्ये 3-पॉइंट सीट बेल्ट आणि सीटबेल्ट रिमाइंडर, कीलेस एंट्री, EBD सह ABS, रिअर पार्किंग सेन्सर्स, ESS, बर्गलर अलार्म, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, रिअर डीफॉगर यांसारख्या अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स दिली जाणार आहेत.

पॉवरट्रेन

या कारमध्ये पॉवरफुल इंजिन देण्याची शक्यता आहे. यात 1.2 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे. हे इंजिन 83 PS आणि 113.8 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे. 5-स्पीड एमटी आणि 5-स्पीड एएमटी दोन्ही पर्याय देण्यात येते.

किंमत

जर या कारच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीकडून सध्या या कारच्या किमती जाहीर करण्यात आल्या नाहीत. परंतु असे मानले जात आहे की कंपनी याला सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत एकूण 6.5 लाख ते 9.5 लाख रुपये बाजारात लॉन्च करू शकते.