Google Pixel 7A : ठरलं तर मग! ‘या’ दिवशी लॉन्च होणार शानदार फीचर्ससह गुगलचा नवीन स्मार्टफोन, जाणून घ्या खासियत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Google Pixel 7A : गुगल या टेक कंपनीने काही दिवसांपूर्वी आपला Google Pixel 6A हा स्मार्टफोन लाँच केला होता. अशातच आता ही कंपनी आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी आता Google Pixel 7A हा स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे.

आपल्या सर्व स्मार्टफोनप्रमाणे कंपनी या फोनमध्येही शानदार फीचर्स देईल. परंतु, अजूनही या कंपनीने आपल्या नवीन स्मार्टफोनच्या किमतीबाबत कोणताही खुलासा केला नाही. या फोनमध्ये कोणती फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दिली जाणार पहा.

Google Pixel 7A

गुगलचा नवीन स्मार्टफोन Pixel 7a मध्ये 6.1 इंच फुलएचडी + 90 हर्ट्ज OLED डिस्प्ले देण्यात येणार आहे. यासह, हा फोन 90 Hz रिफ्रेश रेट स्क्रीनसह लॉन्च केला जाणार आहे. त्यामुळे निश्चितपणे Pixel 7A स्मार्टफोन मागील Pixel 6A पेक्षा मोठा अपग्रेड असणार आहे. तसेच हा फोन गुगलच्या फ्लॅगशिप Tensor G2 चिपसेटसह लॉन्च करण्यात येईल.

नवीन चिपसेटमध्ये, Google ने मागील आवृत्तीच्या तुलनेत बरेच मोठे अपग्रेड दिले आहेत. हा चिपसेट नवीन टेन्सर प्रोसेसिंग युनिटसह येत आहे. असा दावा करण्यात येत आहे की तो कॅमेरा आणि स्पीच टास्क 60 टक्के वेगाने हाताळू शकतो.

कसा आहे कॅमेरा?

Pixel 7A स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. कंपनीचा हा स्मार्टफोन 64 मेगापिक्सेल MX787 सेन्सर आणि 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड सेन्सरसह येणार आहे. पिक्सेल 6A मध्ये Sony Exmor IMX363 12.2 मेगापिक्सल प्राइमरी आणि 12 मेगापिक्सल अल्ट्रावाइड सेंसर मिळू शकेल. आगामी Pixel 7A ला Android 13 आणि 5W वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.