“दंगल पेटवायची असेल, तर त्यांनी स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवावं”

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. तसेच हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावा असेही राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसेमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले होते.

राज ठाकरे यांच्यावर अनेक स्तरातून टीका करण्यात आली. तसेच मनसेतील काही पदाधिकाऱ्यांनी राजूनामा देखील दिला. त्यामुळे राज ठाकरे यांचे हे वक्तव्य आगामी महापालिका निवडणुकीला अडथळा आणणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. याअगोदरही सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिले होते की अमित ठाकरे यांना हनुमान चालीसा म्हणायला लावा.

सुजात आंबेडकर म्हणाले की, अमित ठाकरे यांना स्वतः पर्सनल ईव्हीटेशन दिलं नव्हतं, की तुम्ही येऊन हनुमान चालिसा म्हणा. मेटाफर किंवा पोएट्री आपण म्हणू शकतो, त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता, की

आपण आतापर्यंत किती दंगली बघितल्या, बाबरी मशिद असो किंवा भीमा कोरेगाव असो, दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण असतात आणि त्यांच्या वक्तव्यावरुन प्रभावित होऊन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणारे हे बहुजन असतात,

माझं राज ठाकरेंना एवढंच म्हणणं होतं की तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल, तर बहुजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवा आणि तुम्ही स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका असे सुजात आंबेडकर म्हणाले आहेत.

माझं वक्तव्य पटल्याचं अनेक जणांनी मला सांगितलं. कितीतरी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. अनेक मुस्लिम (Muslim) बांधव मनसेचा राजीनामा देत बाहेर पडले आहेत. अनेक जणांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला विरोधही केला आहे असेही ते म्हणाले आहेत.