इम्रान खान यांनी स्वतःची तुलना केली चक्क गाढवाशी, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) हे नेहमी विविध कारणांवरून सोशल मीडियावर (social media) चर्चेत असतात. त्यातच आता पुन्हा त्यांचा एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral) होत आहे.

या व्हिडिओमध्ये इम्रान खान यांनी स्वतःला चक्क गाढवाची उपमा दिल्याचे समजते आहे. यावेळी ते द सेंट्रम मीडिया (The Centrum Media) नावाच्या यूट्यूब चॅनलच्या शो दरम्यान पाकिस्तान (Pakistan) आणि राजकारणावर बोलत होते.

पंतप्रधान इम्रान खान काय बोलले?

यावेळी त्यांना पाकिस्तानी लोक देश सोडून का जातात? असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना इम्रान यांनी स्वतःचे उदाहरण देत सांगितले की, “मी सुद्धा 20-30 वर्षे बाहेर होतो, क्रिकेट खेळायचो पण मला कधीच मी त्यांच्यातला वाटलो नाही.

मी त्या समाजाचा एक भाग होतो आणि त्यांनी मला मनापासून स्वीकारले होते. ब्रिटीश समाजात अशा प्रकारे स्वीकारणारे फार कमी लोक आहेत. पण इतकं होऊनही मी ते घर कधीच मानलं नाही, कारण मी पाकिस्तानी होतो”

इम्रान य़ांनी “मला जे हवं होतं तेच मी करत होतो, कारण मला माहिती होते मी इंग्रज होऊ शकत नाही. जर तुम्ही गाढवावर पट्टे ओढले तर गाढवाचा झेब्रा होऊ शकत नाही. गाढव ते गाढवच राहील” असं म्हणत स्वतःची तुलना चक्क गाढवाशी केली आहे.

दरम्यान, इम्रान खान यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेक जण यावर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.