iPhone Offer : आयफोनप्रेमींसाठी सुवर्णसंधी! ‘या’ ठिकाणी खूप स्वस्तात मिळतोय iPhone 13 आणि iPhone 14

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone Offer : प्रत्येक वर्षी बाजारात iPhone चे अनेक मॉडेल्स लाँच होत असतात. इतर स्मार्टफोनच्या तुलनेत iPhone मध्ये अनेक वेगळे फीचर्स देण्यात येतात. यामुळे iPhone च्या किमती जास्त असतात. त्यामुळे अनेकांना iPhone खरेदी करता येत नाही.

काही दिवसांपूर्वी बाजारात iPhone 13 आणि iPhone 14 हे दोन मॉडेल्स लाँच झाले आहेत. आता तुम्ही हे मॉडेल मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. तुमची हजारोंची बचत होऊ शकते. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

आयफोन 15 ची किंमत खूप जास्त आहे. तुम्ही iPhone 13 आणि iPhone 14 Amazon-Flipkart वरून खूप स्वस्तात खरेदी करू शकता. कारण या दोन्ही साइट्सवर iPhones ची ऑफर किंमत वेगवेगळी आहे. त्यामुळे अनेकांना हा फोन खरेदी कोठून करावा हा प्रश्न पडला असेल.

iPhone 13 ची Amazon वर किंमत

किमतीचा विचार केला तर iPhone 13 च्या 128GB स्टोरेज वेरिएंटची मूळ किंमत 59,900 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही Amazon सेलमधून 48,999 रुपयांना खरेदी करू शकता.

iPhone 13 ची Flipkart वर किंमत

Flipkart वर iPhone 13 च्या 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 51,999 रुपये इतकी आहे. परंतु हे उपकरण येथे विक्रीसाठी उपलब्ध नाही.

iPhone 14 कोठून खरेदी करावा?

iPhone 14 128GB स्टोरेज वेरिएंटची मूळ किंमत 69.900 रुपये असून या फोनवर फ्लिपकार्टवर 18% पर्यंत डिस्काउंट देत आहे. यानंतर या फोनची किंमत 56,999 रुपये कमी होते. इतकेच नाही तर या फोनची किंमत कमी करण्यासाठी तुम्हाला अनेक बँक ऑफर लागू करता येतील. पण हा फोन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध नाही. अनेकांच्या मनात कोणता आयफोन घ्यायचा? हा प्रश्न सतत पडत असतो. iPhone 13 आणि iPhone 14 मध्ये समान वैशिष्ट्ये, डिझाइन आणि लुक आहेत.

फीचर्स

iPhone 14 च्या प्रोसेसर बद्दल सांगायचे झाले तर यामध्ये खूप पॉवरफुल प्रोसेसर आहे. A15 बायोनिक चिपमध्ये अतिरिक्त GPU कोर देण्यात आली आहे. यामुळे तुमच्या दैनंदिन कामात कसलीच अडचण येत नाही, परंतु ज्यावेळी तुम्ही उच्च ग्राफिक कार्यक्षमतेसह कार्य करता त्यावेळी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तर A16 बायोनिक चिप iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेलमध्ये दिली आहे.

iPhone 14 च्या कॅमेऱ्यात खूप बदल केले आहेत. उदाहरणार्थ, समजा तुम्ही फोटोनिक इंजिन वापरून कमी प्रकाशात फोटोग्राफी केली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. परंतु आयफोन 13 आणि आयफोन 14 दोन्हीमध्ये प्रकाशात फोटोग्राफीची स्थिती कंपनीकडून सारखीच देण्यात आली आहे.

याच्या फ्रंट कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही फोनमध्ये 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. या दोन्ही फोनच्या कॅमेऱ्यातील फरक म्हणजे iPhone 14 मधील अपर्चर Æ’/1.9 आहे. तर iPhone 13 मध्ये Æ’/2.2 अपर्चर आहे. या नवीन फोनमुळे हाय लाइटिंगमध्ये चांगले फोटो काढता येतात. आयफोन 14 च्या फ्रंट कॅमेर्‍यामध्ये पहिल्यांदाच ऑटो-फोकस फीचर जोडले आहे.