“कर्म आहे ना, ते कर्म या जन्मी करतो ते याच जन्मी फेडावे लागते”

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी (MSRTC Protest) हल्ला केला आहे. यानंतर अनेक राजकीय पडसाद उमटत आहेत. भाजपचे नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी या आंदोलनाचे समर्थन करत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले, कर्म आहे ना, ते कर्म या जन्मी करतो ते याच जन्मी फेडावे लागते अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी शरद पवार आत्यांच्यावर टीका केली आहे.

घराणेशाही संपली पाहिजे. लोकशाही टिकली पाहिजे. राज्यामध्ये सध्या घराणेशाही चालू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना घराणेशाहीसाठी पक्ष चालवत आहेत. मुलगा, मुलगी, नातू पक्षामध्ये आमदार-खासदार होत आहेत अशी जोरदार टीकाही उदयनराजे भोसलेंनी केली आहे.

शरद पवार यांच्या मुंबईतील (Mumbai) सिल्वर ओक (Silver Oak) घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी पवार यांच्या घरावर चप्पला फेकल्या.

या आंदोलनानंतर भाजपच्या (BJP) काही नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला तर काही नेत्यांनी चक्क या हल्ल्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी कोल्हापुरात (Kolhapur) आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, यालापोटनिवडणूक म्हणता येणार नाही. वैचारिक स्थिरतेला योगदान दिले पाहिजे.

यासाठी कोल्हापूरमध्ये आलो आहे. आपण सर्वांनी विचार केला.. आपले विचार एकत्र येतात असे लोक कायम स्वरूपी एकत्र येतात.. उद्दिष्टे साध्य झाले की त्याची दिशा वेगवेगळ्या असल्याने वेगळे होतात..महाराष्ट्रामध्ये असे वातावरण आहे असे म्हणत त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे.