कोपरगाव नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कोल्हे गटाचे वर्चस्व

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :-  कोपरगाव नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपा कोल्हे गटाचे मुस्लीम समाजाचे अरिफ करीम कुरेशी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी काम पाहिले.

नवीन निवड झालेले करीम कुरेशी यांच्या नावाची सूचना जनार्दन कदम तर अनुमोदन शिवाजी खांडेकर यांनी दिले. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी म्हणाले की, कोल्हे कुटुंबियांचे सामाजिक कामाचे मुस्लिम समाजावर ऋण मोठे आहे, शहर विकासात नागरिकांच्या संकल्पना पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.

पालिकेसह शहरात भाजपा व कोल्हे गटाची ताकद वाढवून अपेक्षीत ध्येय गाठू, मुस्लिम समाजाच्या संकटकाळात कोल्हे कुटुंबियांनी खंबीरपणे दिलेली साथ मोलाची आहे. या ऋणातून उतराई होण्यासाठी शहर विकासाची जास्तीत जास्त कामे करून तो प्रयत्न करू असे सत्कार प्रसंगी ते म्हणाले.

शहर विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्याने नागरिकांच्या गरजा वाढत आहेत. त्याप्रमाणे विकासकामात सातत्य ठेवून शहर विकास साधावा अशी अपेक्षा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सत्कारप्रसंगी व्यक्त केली.

त्याचबरोबर मावळते उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याचा उल्लेख करत त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. गटनेते रवींद्र पाठक यांनी आभार मानले.