Laptop Alert : चुकूनही करू नका ‘या’ चुका, नाहीतर तुमच्याही लॅपटॉपचा होऊ शकतो स्फोट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Laptop Alert : स्मार्टफोनचा वापर सध्याच्या काळात जसा वाढला आहे तसाच आता लॅपटॉपचाही वापर खूप वाढला आहे. इतकेच नाही तर आता शाळा, महाविद्यालये, ऑफिसमध्ये संगणकाची जागा लॅपटॉप घेऊ लागला आहे. लॅपटॉप हा कुठेही घेऊन नेता येतो त्यामुळे आता जवळपास सर्व काम चुटकीसरशी होऊ लागली आहेत.

तसेच जर तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर त्याची तशी काळजी घेणे गरजेचे आहे. जर लॅपटॉप व्यवस्थित वापरला नाही तर त्याचे खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. परिणामी त्याचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे लॅपटॉप वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

लॅपटॉप चार्ज करत असताना विसरू नका या गोष्टी

क्रमांक 1

तुम्हाला हे माहिती आहे की तुम्ही लॅपटॉप कुठेही घेऊन काम करू शकता. मात्र काम करत असताना तुम्ही तो बेडवर नेऊन चार्ज करणे टाळले पाहिजे. कारण तुम्ही असे केले तर शॉर्ट सर्किट होऊन बेडला आग लागू शकते.

क्रमांक 2

हे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा चार्जिंग गरजेची आहे तेव्हाच लॅपटॉप चार्ज करत जा. तसेच अनेकांना चार्जर सतत चार्जिंग पॉईंटमध्ये लावून ठेवण्याची सवय असते, खरंतर हे खूप चुकीचे आहे. जर तुम्ही असे केले तर चार्जर सतत गरम होत राहतो आणि त्यात आग लागण्याचा धोका असतो.

क्रमांक 3

तर अनेकजण आपला लॅपटॉप कोणत्याही गरजाशिवाय चार्ज करतात. जर तुम्ही असे करत असाल तर असे करणे टाळा, कारण लॅपटॉप आणि चार्जर दोन्ही जास्त गरम होतात आणि नंतर आग लागण्याचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळे गरज असेल तेव्हाच लॅपटॉप चार्ज करा.

क्रमांक 4

तुमचा लॅपटॉप चुकूनही स्थानिक चार्जर किंवा इतर कोणाच्या लॅपटॉप चार्जरने चार्ज करू नये. जर तुम्ही असे केले तर चार्जर आणि लॅपटॉपचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे लॅपटॉप नेहमी मूळ कंपनीच्या चार्जरने चार्ज करा.