Monsoon update : मान्सूनबाबत मोठी बातमी ! मुंबईत रेड अलर्ट तर, राज्यात या ठिकाणी दमदार पाऊसाचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon update : भारतीय हवामान खात्याने मुंबईत (Mumbai) पुढचे तीन दिवस रेड अलर्ट (Red Alert) दिला असून मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. तसेच कोकणातही पावसाने (Rain) हजेरी लावली असून शेतकऱ्यांमध्ये (Farmer) आनंदाचे वातावरण आहे.

राज्यात कोकण परिसरात पाऊस होत आहे परंतु राज्यातील अनेक भागात पावसाची उघडीप असून, तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

अरबी समुद्रात समांतर हवेच्या कमी दाबाचा निर्माण झाल्याने कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड (Ratnagiri, Sindhudurg, Raigad in Konkan) जिल्ह्यांत अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होऊन अतिवृष्टी झाली.

तर मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, तर कोकण आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे.

गगनबावडा, महाबळेश्वर, लोणावळा, इगतपुरी भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भातही चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. तर उर्वरित राज्यात मात्र तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

दरम्यान मागच्या 24 तासांमध्ये राज्यात कोकण विभागात कुलाबा २३०, सांताक्रूज 170, गुहागर, राजापूर, मालवण, लांजा प्रत्येकी 150. रामेश्वर 120, रत्नागिरी 110, मुरूड, वरण, वसई, सावंतवाडी प्रत्येकी 100, देवगड, श्रीवर्धन, ठाणे प्रत्येकी 90, दोडामार्ग 80, दापोली, पेण, संगमेश्वर, वैभववाडी प्रत्येकी विदर्भ : 70, तलासरी, तळा, पनवेल, रोहा प्रत्येकी 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, कोकण किनारपट्टीवर जोरदार बरसणारा पाऊस, राज्यात मात्र कमजोर असल्याचे चित्र आहे. कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असला तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या अनेक भागांत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. कोकणात जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.