Oppo F23 5G : स्वस्तात मस्त! 64MP कॅमेरा आणि 67W चार्जिंगसह कमी किमतीत खरेदी करता येणार Oppo F23 5G, पहा ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Oppo F23 5G : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच Oppo F23 5G हा फोन भारतीय बाजारात लाँच केला जाणार आहे. जो तुम्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.

कारण अजूनही या फोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला नाही. कंपनी आपला आगामी फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह एकाच प्रकारात लॉन्च केला जाणार आहे. जाणून घेऊयात फीचर्स आणि किंमत.

कंपनीचा नवीन फोन एकाच रॅम आणि स्टोरेज व्हेरियंटमध्ये आणि दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर या फोनसाठी 15 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून प्री-ऑर्डर घेण्यात येतील. ऑफर्सनंतर तुम्हाला हा फोन स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

जाणून घ्या किंमत

किमतीबाबत बोलायचे झाले तर टिपस्टर सुधांशू अंबोरने एका ट्विटमध्ये Oppo F23 5G च्या संभाव्य किंमतीशी निगडित माहिती शेअर केली असून फोनची किंमत 25,000 ते 26,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह एकाच प्रकारात लॉन्च करण्यात येईल. लॉन्च ऑफर आणि डिस्काउंटनंतर, कंपनीचा हा 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल, तर मागील रिपोर्ट्समध्ये फोनची किंमत सुमारे 28,000 रुपये असल्याचा दावा करण्यात आला होता.

जाणून घ्या फीचर्स

लीक आणि मागील अहवालांवर विश्वास ठेवायचा झाल्यास आगामी फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह फोनमध्ये 6.72-इंच फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले पॅनल असेल. Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर असणाऱ्या या फोनमध्ये Android 13 वर आधारित ColorOS 13 सॉफ्टवेअर स्किन मिळेल.

तसेच या फोनच्या मागील पॅनलवर 64MP मुख्य, 2MP मोनोक्रोम आणि 2MP मॅक्रो कॅमेरा असेल. इतकेच नाही तर यात 32MP फ्रंट कॅमेरासह 5000mAh बॅटरी असेल ज्याला 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात येईल.

हा फोन बोल्ड गोल्ड आणि कूल ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात येईल असे टीझरवरून समोर आले आहे. तसेच स्पेशल व्हर्च्युअल रॅम फीचरच्या माध्यमातून त्याची रॅम 5GB ने वाढवता येईल आणि ग्राहकांना या फोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्याचा पर्याय मिळू शकतो. Oppo F23 5G चे वजन 200 ग्रॅमपेक्षा कमी असून त्याला 3.5mm हेडफोन जॅक मिळू शकतो.