अन्यथा ‘त्यांनी’ घरचा रस्ता धरावा!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- आपण लोकसेवक आहोत. लोकांची कामे होत नसतील तर आपली पदे शोभेची आहेत का?  ढीगभर तक्रारी आहेत. सत्ता ही गरीबांच्या कल्याणासाठी असते हे स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांची शिकवण अंगी बाळगा अन्यथा आता मला कठोर निर्णय घ्यावी लागतील.

ज्यांना कामे करायची नाहीत त्यांनी घरचा रस्ता धरावा अशा शब्दात आ. मोनिका राजळे यांनी आढावा बैठकीत सरकारी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. येथील तहसील कार्यालयात आढावा बैठकीत राजळे बोलत होत्या.

नगरपालिकेतही मुख्याधिकारी कार्यालयीन कामात हलगर्जीपणा करतात या सर्वच गोष्टीचा आढावा घेवुन कामात कुचराई करणाऱ्यांना यापुढे माफी नाही. कामे होत नसतील तर घरी निघुन जा असे राजळे म्हणाल्या.

भुमिअभिलेख नागरीकांची सर्वाधिक अडवणूक होते. आर्थिक देवाण-घेवाणी शिवाय तेथे कोणतेही काम होत नसल्याच्या तक्रारी नागरीकांनी मांडल्या. नगरपालिकेत तर कागद हलत नाही.

विकासाच्या कामावर त्याचा वाईट परिणाम होतो व नागरीकांच्या रोषाला पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते अशा तक्रारी आहेत. मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना तर काम होत नसेल तर तसे लेखी द्या व निघुन जा असे राजळे यांनी सांगितले.

पंचायत समितीच्या घरकुल योजनेच्या यादीत सधन व्यक्तींची नावे आली आणि गरीबांची नावे गायब झाली. याचा तपास करा आणि गरीबांना न्याय कसा देता येईल यासाठी चौकशी करण्याच्या सुचना दिल्या.