Post Graduate झालंय, पण जॉब मिळत नाही? मग घडवा असे करिअर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : कॉलेज जीवनानंतर (College life) सर्वांची महत्वाची गोष्ट बनते ती म्हणजे जॉब. कारण शिक्षण केल्यानंतर जॉब (Job) लगेच मिळतो असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र ऐनवेळी हातातून संधी जाते आणि जॉब मिळत नाही.

अनेक मुले Post Graduate करून योग्य पगार व काम मिळत नसल्याने घरी बसले आहेत. असा मुलांसाठी एक संधी आहे. त्यातून तुम्ही तुमचे भविष्य (Future) घडवू शंभर आहेत. त्यासाठी काय करावे पहा.

जर तुम्हाला प्रोफेसर होण्याची इच्छा असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला प्रोफेसर (How to become college Professor) होण्यासाठी लागणारी पात्रता (Eligibility for professors) आणि प्रोफेसर्सना मिळणाऱ्या पगाराबद्दल (Salary of Professor) तुम्हाला सांगणार आहोत.

यासाठी तुम्हाला शिकवण्याच्या कामाची आवड, संबंधित विषयातील आवड आणि ज्ञान, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा, योग्य संवाद, योग्य संशोधन, समस्या सोडवण्याची क्षमता, वेळेचे व्यवस्थापन आणि सकारात्मक आत्मविश्वास. या गोष्टी असतील तरच तुम्ही एक चांगले प्रोफेसर होऊ शकता.

तसेच प्रोफेसर होण्यासाठी तुम्हाला संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. प्रोफेसरची जबाबदारी वर्गात शिकवणे आणि व्याख्याने एवढी मर्यादित नाही. ते पर्यवेक्षण, मार्गदर्शन, संशोधन, देखरेख, रेकॉर्ड ठेवणे, विद्यार्थ्यांना समजून घेणे इत्यादी असतात.

करिअरच्या संधी प्रोफेसर हे सहाय्यक प्राध्यापक ते कुलपती पदापर्यंत जाऊ शकतात, जसे की – सहायक प्राध्यापक > वरिष्ठ प्राध्यापक > प्राध्यापकाची प्रतिष्ठित व्यक्ती > डीन / संचालक > प्र-कुलगुरू > कुलगुरू. तुम्हाला विविध सरकारी महाविद्यालये, खाजगी महाविद्यालये, विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमध्ये संधी मिळू शकतात.

किती असतो पगार?

आपल्या देशात प्राध्यापक किंवा व्याख्याते चांगले वेतन पॅकेज घेतात. प्राध्यापकांचा पगार अनेक बाबींवर अवलंबून असतो जसे की: स्थान, संस्थेचा प्रकार, अनुभव परंतु साधारणपणे, असिस्टंट प्रोफेसरचा सरासरी मासिक पगार 40000 – 90000 च्या दरम्यान असतो. साधारणपणे, सहाय्यक प्राध्यापक काही वर्षांचा अनुभव आणि विभागीय परीक्षा देऊन प्राध्यापक बनतात, ज्यांचे वेतन सुमारे 80,000 ते 1,50,000 किंवा त्याहूनही अधिक असू शकते.