Poultry Farming : सावधान! बर्ड फ्लूचा वेगाने होतोय प्रसार; ‘या’ पद्धतीने करा कोंबड्यांचे संगोपन; नाहीतर होणार नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Poultry Farming :शेतीमध्ये फार पूर्वीपासून शेतीपूरक व्यवसाय (Agricultural Business) करण्याची परंपरा सुरू आहे. शेती समवेतच अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकरी बांधव पशुपालन करीत आले आहेत.

विशेष म्हणजे पशुपालन (Animal Husbandry) शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. पशुपालनात कुक्कुटपालन (Poultry farming) हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी तसेच भूमिहीन शेतकरी करताना बघायला मिळतो.

सध्या दुय्यम व्यवसाय म्हणून ओळखला जाणारा कुकूटपालन आता प्राथमिक व्यवसायाची जागा घेत आहे. याचे कारण असे की आता बहुतांशी शेतकरी व्यावसायिक दृष्ट्या कुकूटपालन करू लागले आहेत.

अनेक पशुपालक शेतकरी (Livestock Farmer) शेतातच पोल्ट्री फार्म उघडून आपले उत्पन्न वाढवत आहेत. या व्यवसायाची विशेष बाब म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून (Government Scheme) आर्थिक सहाय्य देखील पुरवले जाते.

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी एक कोंबडीफार्म उभारण्यासाठी शासनाकडून लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ दिला जातो. आज पोल्ट्री फार्म हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या व्यवसायांमध्ये गणला जातो. अशा परिस्थितीत कोंबड्यांना वाचवण्याची जबाबदारीही महत्त्वाची ठरते.

बर्ड फ्लू कोंबड्यासाठी बनू शकतो काळ (Bird flu can be dangerous for chickens)
पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू हा एक गंभीर आजार आहे. हा रोग खूप वेगाने पसरतो. असे सांगितले जाते की, कोंबडी फार्म मध्ये या रोगाचा शिरकाव झाला तर संपूर्ण पोल्ट्री फार्म नष्ट होऊ शकतो.

या आजाराने ग्रस्त कोंबड्या एकामागून एक मरायला लागतात. यामुळे, बर्ड फ्लू हा रोग आल्यास याचा प्रसार रोखण्यासाठी दरवर्षी लाखो कोंबड्या मारल्या जातात. कधीकधी हा संसर्ग इतका वाढतो की तो माणसापर्यंत पोहोचतो.

हे पाहता प्रत्येक पशुपालक शेतकरी व कुक्कुटपालन व्यवसायाने बर्ड फ्लू प्रतिबंधाबाबत जागरुक राहणे गरजेचे आहे जेणे करून त्याला वेळीच प्रतिबंध करता येईल व संभाव्य नुकसान टाळता येईल.

बर्ड फ्लू आजाराचे लक्षण (Symptoms of bird flu) बर्ड फ्लूसाठी H5N1 या विषाणूच्या माध्यमातून होतं असतो. हा एक हानिकारक विषाणू आहे जो की पक्ष्यांना झपाट्याने संक्रमित करतो.

यामुळे बाधित पक्ष्यांची पिसे गळायला लागतात, त्यांना ताप येऊ लागतो. बाधित पक्ष्यांच्या शरीराचे तापमान सामान्यपेक्षा खूप जास्त होते आणि संसर्ग वाढल्यास पीडित पक्षी मरण देखील पावतो. बर्ड फ्लूची लागण झालेल्या कोंबड्यांमध्ये

दिसणारी काही लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत-
या आजाराने बाधित पक्ष्याच्या डोळ्याभोवती, मानेला तसेच डोक्याभोवती सूज येते.
पायांवर निळसर छटा उमटतात.
अचानक पिसांची गळती सुरु होते.
पक्षी काहीच खात नाहीत.
पक्ष्यांच्या शरीरात थकवा आणि सुस्ती येते यामुळे पक्ष्याचा मृत्यू देखील होऊ शकतो.

बर्ड फ्लू बाधित कोंबड्या पासून इतर कोंबड्यांचे संरक्षण कसे करावे (How To Prevent Chicken From Bird Flu)
»दोन प्रजातींचे पक्षी एकाच फार्म मध्ये ठेवू नका

पशुपालक शेतकरी जागा कमी पडल्यास दोन प्रजातीचे पक्षी किंवा प्राणी एकाच ठिकाणी ठेवू लागतात, असे अनेकवेळा दिसून येते.

उदाहरणार्थ, तितर, इतर लहान पक्षी कोंबडीबरोबर एकाचफार्म मध्ये ठेवतात. अशा परिस्थितीत बर्ड फ्लू होण्याचा धोका वाढतो. आणि यापैकी एका पक्ष्यालाही बर्ड फ्लूची लागण झाली असेल,

तर त्याचा संसर्ग कुंपणातील किंवा फार्म मधील पक्ष्यांच्या इतर प्रजातींनाही होतो. यामुळे प्रसारणाचा वेग वाढतो आणि हा रोग केवळ कोंबडीमध्येच नाही तर तीतर, लहान पक्षी मध्ये देखील पसरतो.

यामुळे वेगवेगळ्या जातीचे पक्षी एकाच गोठ्यात कधीही ठेवू नये. संभाव्य धोका टाळण्यासाठी, पक्षी आणि प्राण्यांच्या प्रत्येक प्रजातीसाठी स्वतंत्र शेड ठेवा.

»कोंबडी फार्ममध्ये बाहेरील पक्षी जाऊ नका देऊ
बर्ड फ्लू हा एक असा आजार आहे जो एका पक्ष्यापासून दुसऱ्या पक्ष्यामध्ये वेगाने पसरतो. या आजारात संक्रमणाचा सर्वाधिक धोका असतो. यामुळे पोल्ट्री फार्ममध्ये बाहेरील पक्ष्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात यावी.

एवढेच नाही तर बाहेरील व्यक्तींना पोल्ट्री फार्ममध्ये प्रवेश देऊ नये. कारण पोल्ट्री फार्मवर येणारा एखादा बाहेरचा माणूस किंवा पक्षी बर्ड फ्लूने ग्रस्त असेल तर तो तुमच्यासाठी आणि तुमच्या पोल्ट्री फार्मसाठी मोठा धोका ठरू शकतो.

»पोल्ट्री फार्ममध्ये नवीन पक्षी आणण्यापूर्वी हे काम करा
पोल्ट्री फार्ममध्ये नवीन उपकरणे किंवा कोणताही नवीन पक्षी आणायचा असल्यास प्रथम आवश्यक औषधांची फवारणी करून संसर्गमुक्त करावे. कोणतेही डिव्हाइस वापरण्यापूर्वी देखील हिच गोष्ट करा.

त्यामुळे बर्ड फ्लूचा धोका बर्‍याच अंशी टळू शकतो. जर तुम्ही तुमच्या पोल्ट्री फार्ममध्ये नवीन पिल्ले आणत असाल तर त्यांना किमान 30 दिवसांनी निरोगी पिल्ले सोबत ठेवावीत.

या काळात, पिलांवर 30 दिवस लक्ष ठेवावे जेणेकरुन बर्ड फ्लू सारखी लक्षणे दिसल्यास त्यांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक पावले उचलता येतील. याशिवाय पोल्ट्री फार्मची वेळोवेळी साफसफाई करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, आवारातील कोणत्याही पक्ष्यामध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसल्यास, तो पक्षी इतर निरोगी पक्ष्यांपासून ताबडतोब वेगळा करावा आणि त्याला वेगळ्या ठिकाणी ठेवावे.

याशिवाय, प्रशासन आणि जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाला माहिती द्यावी जेणेकरून बर्ड फ्लूच्या धोक्याला तोंड देण्यासाठी आवश्यक पावले उचलता येतील.

असे केल्याने शेतकरी त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा प्रसार टाळू शकतात. शिवाय आजूबाजूच्या परिसरात होणारा प्रसार देखील यामुळे टळू शकतो.