कैद्यांना तुरुंगात करता येणार ‘हनीमून’, या सरकारचा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News:शिक्षेची अनेक वर्ष एकाकीपणाचा सामना करणाऱ्या कैद्यांसाठी आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण आता तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना कारागृहात पत्नीची भेट घेता येणार आहे.

याशिवाय त्यांना तुरुंगातच लैंगिक संबंधही प्रस्तापित करता येतील. त्यासाठी कारागृह प्रशासनानं विशेष खोल्याची व्यवस्था केली आहे. पंजाबच्या तुरुंगात विविध गुन्ह्यांखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना ही सोय करून देण्यात येणार आहे.

यासाठी तुरुंग प्रशासनाने कैद्यांना अर्ज करण्याचे आवाहन केसे असता तब्बल ३८५ कैद्यांनी पत्नीला निवांत भेटण्यासाठी अर्ज केला आहे. ही सुविधा अमेरिका, फिलिपिन्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, फ्रान्स, सौदी अरेबिया आणि जर्मनी या देशांमध्ये फार पूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

परंतु आता पंजाब सरकारनेही कैद्यांच्या स्वातंत्र्याबाबत हा निर्णय घेतला आहे. याबाबत पंजाबचे विशेष महासंचालक हरप्रीत सिद्धू माध्यमांशी बोलताना म्हणाले की,

एखाद्या कैद्याचा जोडीदार त्याच्या सहवासाशिवाय बाहेर असणे ही देखील एक प्रकारची शिक्षाच आहे. परंतु आम्ही कैद्यांनी केलेल्या गुन्ह्यांनुसार आणि तुरुंगातील त्यांच्या वागणुकीनुसार ही सुविधा देणार आहोत.

कोणत्या कैद्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार?

१. जे कैदी अनेक वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

२. ज्या कैद्याचं वर्तन तुरुंगात योग्य आणि सुधारणापूर्वक राहिलेलं आहे.

३. ज्या कैद्यांची शिक्षा संपत आली आहे.

४. जे कैदी पॅरोलवर बाहेर गेले होते, त्यांना ही सुविधा सर्वात शेवट मिळेल.

कोणत्या कैद्यांना ही सुविधा मिळणार नाही?

१. उच्च जोखमीचे गुन्हे केलेल्या आणि दहशतवादी कृत्यांमध्ये दोषी कैदी

२. लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले कैदी

३. टीबी, एचआयव्ही आणि लैंगिक आजारांनी त्रस्त कैदी

४. एकापेक्षा अधिक हत्यांमधील दोषी कैदी