विधानपरिषदेसाठी भाजपाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ‘या’ वंशजास संधी …!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra news : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार असून, भाजपच्या चार जागा खात्रीशीर निवडून येऊ शकतात.

त्या जागांपैकी एका जागेवर माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांना विधानपरिषदेसाठी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी प्रा. राम शिंदेंची विधानपरिषद उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे कर्जत – जामखेडसह राज्यभरातील समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

२०१९ च्या निवडणुकीत
कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात भाजपचे माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांचा पराभव झाला होता. विधानपरिषदेतील भाजपच्या चार जागा रिक्त झाल्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील राष्ट्रवादीचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी तसेच युवा आमदार रोहित पवार यांच्या विरोधात राम शिंदे यांना बळ मिळावे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी व आगामी निवडणुकी संदर्भात भाजप मजबुतीसाठी राम शिंदे यांना विधान परिषदेची संधी मिळावी, अशी गळ अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना घातली होती.

यानुसार भाजपाने राम शिंदे यांची उमेदवारी निश्चित केली आहे.दरम्यान या उमेदवारी जाहीर केल्याने माजी मंत्री प्रा.राम शिंदे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नवे वशंज असून ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू आहेत अखेर त्यांना न्याय मिळाला असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.