Redmi Note 12 : खरेदीदारांनो.. सोडू नका अशी संधी! ‘इतक्या’ स्वस्तात मिळतोय Redmi चा जबरदस्त स्मार्टफोन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Redmi Note 12 : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. ज्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. तुम्ही आता रेडमीचा Redmi Note 12 हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी कंपनीने आपला फोन लाँच केला आहे. ज्यावर आता तुम्हाला खूप मोठी बचत करता येईल. कंपनीच्या वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर ऑफर उपलब्ध आहे. त्वरित याचा लाभ घ्या. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

स्वस्तात येईल खरेदी करता

किमतीचा विचार केला तर हे लक्षात घ्या की, लॉन्चच्या वेळी, Redmi Note 12 स्मार्टफोनच्या 6GB 64GB वेरिएंटची मूळ किंमत 14,999 रुपये तसेच 6GB 128GB वेरिएंटची किंमत 16,999 रुपये होती. परंतु, सध्या फोनचे 6GB 64GB वेरिएंट 12,999 रुपये आणि 6GB 128GB व्हेरिएंट Flipkart, Amazon आणि mi.com वर 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

तसेच तुम्ही HDFC, ICICI, Axis आणि SBI क्रेडिट कार्डने केलेल्या खरेदीवर 1000 रुपयांची झटपट सवलत देखील मिळवू शकता. त्यानंतर 6GB 64GB मॉडेलची प्रभावी किंमत 11,999 रुपये इतकी असणार आहे आणि 6GB 128GB मॉडेलची प्रभावी किंमत 13,999 रुपये इतकी असणार आहे. तुम्हाला हा स्मार्टफोन आइस ब्लू, सनराइज गोल्ड आणि लुनर ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल. बँक ऑफर ही कंपनीच्या वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर उपलब्ध असेल.

Redmi Note 12 4G ची फीचर्स

Redmi Note 12 हा फोन 4G सपोर्टसह येतो आणि त्यात फुल एचडी+ रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले, 1200 nits पीक ब्राइटनेस,120Hz रिफ्रेश रेट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 संरक्षण आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 685 प्रोसेसरने सुसज्ज असून रॅम आणि स्टोरेजनुसार, फोन 6GB 64GB आणि 6GB 128GB अशा दोन प्रकारांमध्ये येतो. कंपनीचा हा फोन MIUI 14 वर आधारित Android 13 वर काम करतो. यात Android 14 आणि Android 15 वर अपग्रेड करण्यायोग्य आहे.

बॅटरी आणि कॅमेरा

तसेच फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह 50-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्स, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स दिल्या आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी दिली असून चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय या फोनमध्ये 3.5mm जॅक उपलब्ध असून हाय-रेस ऑडिओला सपोर्ट करतो. तर सुरक्षिततेसाठी, या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर कंपनीने दिला आहे.