Car Buying Guide : SUV की MPV? कोणती कार आहे तुमच्यासाठी बेस्ट, जाणून घ्या एका क्लिकवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car Buying Guide : अनेक जणांकडे स्वतःची कार आहे. देशात सध्या SUV आणि MPV वाहनांची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांही भारतीय बाजारात जबरदस्त फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत आहेत.

या कंपन्यांची जणू काही स्पर्धाच निर्माण झाली आहे. परंतु, काही ग्राहकांना SUV कार की MPV कार घ्यावी हा प्रश्न पडतो. जर तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

SUV म्हणजे स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल

SUV कार म्हणजे स्पोर्ट्स युटिलिटी वाहने. या विभागातील कार साहसी आणि क्रीडा क्षमतांनी सुसज्ज आहेत. यामध्ये तुम्हाला चांगला ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. या प्रकारची वाहने अवघड रस्त्यावरून जाणे सोपे असते. काही SUV मध्ये अगदी ऑफ-रोडिंगची क्षमता असते.

म्हणजेच, तुम्ही त्यांना डोंगराळ, चिखल आणि खडबडीत रस्त्यावर घेऊन जाऊ शकता. SUV देखील अनेक श्रेणींमध्ये येऊ लागल्या आहेत. सर्वात ट्रेंड मायक्रो आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा आहे. SUV ची काही उदाहरणे आहेत- महिंद्रा थार, टोयोटा फॉर्च्युनर, ह्युंदाई क्रेटा, मारुती ग्रँड विटारा.

MPV म्हणजे मल्टी पर्पज व्हेइकल

एमपीव्ही कार म्हणजे मल्टी पर्पज व्हेइकल.अशी वाहने अनेक कारणांसाठी वापरली जाऊ शकतात. तुम्हाला यामध्ये जास्त जागा दिली जाते आणि इतर गाड्यांपेक्षा जास्त लोक त्यात बसू शकतात.

भारतातील बहुतेक MPV कार 6 किंवा 7 आसनी आहेत. यामध्ये प्रवाशांच्या बसण्यासाठी तीन रांगा आहेत. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तिसरी रांग फोल्ड करून बूट स्पेस वाढवू शकता. MPV कार विशेषत: मोठ्या कुटुंबांसाठी किंवा व्यावसायिक वापरासाठी अधिक खरेदी केल्या जातात.