महाविकास आघाडी सरकार सर्वांमागे खंबीरपणे उभे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोनाच्या कठीण परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार जनतेचे आरोग्य अबाधित रहावे, यासाठी धडाकेबाज निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढल्यामुळे शासनाला नाईलाजाने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला. रिक्षाचालक व बांधकाम मजुरांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

याची जाणीव सरकारला असून रिक्षाचालक व बांधकाम मजुरांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. हातावर पोट भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांनाही मदत विचाराधीन असून सरकार सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगाव तालुक्याला कोरोनामुक्तीकडे घेऊन जाण्यासाठी आमदार काळे यांनी आरोग्य विभाग व प्रशासनाला सर्वोतोपरी मदत वेळेत उपलब्ध करून दिली. त्याबद्दल शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यायाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिवसेना विधानसभा संघटक अस्लम शेख, एसटी. कामगार सेना अध्यक्ष भरत मोरे, शहरप्रमुख कलविंदरसिंग डडियाल, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफानभाई शेख, उपशहर प्रमुख विकास शर्मा, गगन हाडा, शहर संघटक बाळासाहेब साळुंके, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख राहुल देशपांडे,

व्यापारी सेना शहरप्रमुख योगेश मोरे, शिंगणापूर गणप्रमुख अविनाश वाघ, वाहतूक सेना शहरप्रमुख जाफर शेख, गटप्रमुख रवींद्र शिंदे, गौरव चोपदार, वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख अमजद शेख व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शहरप्रमुख डडियाल म्हणाले, संपूर्ण मतदारसंघाला काळे यांनी आपले कुटुंब मानले असून कुटुंबप्रमुखाची जबाबदारी काय असते, याचे आदर्श उदाहरण आमदार काळे आहेत.