तीन दोस्तांची भन्नाट कामगिरी! युट्युबच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना दिला यशाचा कानमंत्र; वाचा ही भन्नाट कहाणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer succes story : भारत एक कृषिप्रधान देश (Agriculture Country) मात्र देशातील नवयुवक शेतीकडे पाठ फिरविताना बघायला मिळत आहे. परंतु आता काळाच्या ओघात नव युवकांना देखील शेती मध्ये रस वाटू लागला आहे.

यामुळे आता देशातील नवयुवक तरुण शेती व्यवसायात (Farming) उतरत असून वेगवेगळे स्टार्टअप देखील सुरू करत आहेत. विशेष देशातील कृषी क्षेत्रात (Farming Sector) तरुणांनी सुरू केलेल्या स्टार्टअप्सचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

कारण युवक असे काम करत आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) समस्या सुटत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून ते बियाणे, कृषी तंत्रापर्यंतची संपूर्ण माहिती मिळत आहे.

ओडिशामध्ये देखील तीन मित्रांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी असेच काम सुरू केले होते, ज्याचा ओडिसा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होत आहे. खरे तर चंदन कुमार मन्ना, संदीप कुमार आणि प्रशांत कुमार सेनापती या तीन मित्रांनी मिळून ई-फार्मिंग ओडिशा यूट्यूब चॅनल सुरू केले. जिथे शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या सोडवल्या जातात.

शेतकर्‍यांना अधिक कृषी उत्पादन आणि कृषी तंत्रांचे ज्ञान मिळवून देण्यासाठी त्यांना जागरुक करून त्यांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने, या तिन्ही मित्रांनी मिळून 2018 मध्ये एक YouTube चॅनेल सुरू केले.

तरुणांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाला शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला आणि आज या यूट्यूब चॅनेलचे 6.25 लाख सबस्क्राइबर्स आहेत. द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, यूट्यूब चॅनल सुरू करणाऱ्या या तीन तरुणांचे म्हणणे आहे की, एकदा ते शेतीच्या समस्या सोडवण्यासाठी यूट्यूबवर ब्राउझ करत असताना त्यांना तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक व्हिडिओ दिसले, पण त्यांना ओरिया भाषेत शेती संबंधित चॅनेल आढळले नाही; यामुळे त्यांनी यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर
या तिन्ही मित्रांनी ठरवले की त्यांच्या यूट्यूब चॅनेलद्वारे कृषी तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती ओडिया भाषेत शेअर केली जाईल. त्यानंतर त्यांनी ई-फार्मिंग नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले. यूट्यूब चॅनेल सुरू केलेल्या तीन मित्रांपैकी एक, बंगळुरूमध्ये सॉफ्ट इंजिनिअर म्हणून काम करणारे चंदन कुमार मन्ना सांगतात की, त्यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला आणि कोणत्या पिकातून किंवा कोणत्या प्रकारची शेती केली, तर त्यातून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल याविषयी शेतकऱ्यांना अवगत केले.

युट्युब व्हिडिओ बघून शेतकऱ्यांनी केली सफरचंदाची शेतीला सुरवात
शेतकऱ्यांना या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून ओडिया भाषेत ओडिसा राज्यात सफरचंद कसे पिकवायचे हे सांगितले. एवढेच नाही या तिघांनी त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना 10,000 HRMN-99 जातीच्या सफरचंदांच्या रोपांचे वाटप केले.

ही सफरचंदाचे वाण उष्ण हवामानात देखील वाढत असल्याने त्यांनी याचे वाटप केले. जलेश्वर येथील शाळेतील शिक्षक सांगतात की, सफरचंदाच्या जातींबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही 2020 मध्ये हिमाचल प्रदेशातील हरिमन शर्माच्या शेताला भेट देऊन सुरू केलेला हा प्रयोग आहे.

या चॅनेलवर दर आठवड्याला किमान चार व्हिडिओ अपलोड केले जातात. ज्यामध्ये शेतीचे विविध पैलू सांगितले जातात, तसेच यशस्वी आणि अनुभवी शेतकऱ्यांच्या मुलाखतीही घेतल्या जातात.

10,000 लोक मशरूम शेती करत आहेत
चंदन कुमार मन्ना सांगतात की, कोरोना महामारीच्या काळात बाहेर राज्यात कामाला असलेले अनेक मजूर ओडिशात परतले. यापैकी जवळपास 10,000 लोक त्यांच्या चॅनेलद्वारे मशरूमची लागवड शिकून मशरूमचे यशस्वी उत्पादन घेत आहेत.

अनेक लोकांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन सुरु केले आहे यासाठी देखील शेतकऱ्यांना या युट्युब चॅनेलचा फायदा झाला आहे. याशिवाय 2019 मध्ये या तीन तरुणांनी ई-फार्मिंग नावाचे मोबाइल अँप्लिकेशन देखील सुरू केले आहे.

जिथे देशभरातील शेतकरी आपला माल विकू शकतात. दर महिन्याला सुमारे 50 हजार शेतकरी हे अँप्लिकेशन मोफत वापरतात. याशिवाय त्यांनी ऍग्रोकार्ट ही एक वेबसाइट सुरू केली आहे, जिथे शेतकरी शेतीची साधने, बियाणे, कीटकनाशके आणि इतर वस्तू खरेदी करू शकतात.

निश्चितच या तीन मित्रांनी सुरू केलेला हा स्टार्ट अप शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी काम करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व गोष्टींचे सहकार्य होत आहे.