रेखा जरे हत्याकांड प्रकरणी पारनेर न्यायालयाने दिले हे आदेश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-रेखा जरे यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी बाळ बोठे याला शनिवारी पोलिसानं हैदराबाद येथून ताब्यात घेतले आहे.

तसेच बोठे याला मदत करणारा हैदराबाद येथील वकील जनार्दन अकुला चंद्राप्पा व नगरचा हॉटेल व्यवसायीक महेश वसंतराव तनपुरे यांना पारनेरच्या न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी दिली.

याप्रकरणाची सविस्तर माहिती अशी कि, हैद्राबादमध्ये बोठे वकील जनार्दन अकुला चंद्रप्पा याच्या आश्रयाने लपून बसला होता. त्यास दडून बसण्यासाठी राजशेखर अंजय चकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ हे मदत करीत होते.

तर महेश तनपुरे हा मोबाईवरील संपर्कावरून बोठे यास माहीती देत होता. बोठेच्या पत्नीचे बोलणे करून देत होता. यापैकी जनार्दन अकुला चंद्राप्पा व महेश तनपुरे यांना शनिवारी पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

तर उर्वरीत आरोपींना शुक्रवारी पारनेरच्या न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली. तर पी.अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी फरार आहे.

अकुला चंद्रप्पा तसेच तनपुरे यांना न्यायालयापुढे उभे करण्यात आले. यावेळी दोन्ही आरोपींच्या युक्तिवाद करत आरोपींना पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी देण्यासाठी युक्तिवाद केला. पोलिसांच्या वतीने उपअधीक्षक अजित पाटील यांनी स्वतः बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने दोघा आरोपींना 16 मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर