Toll Plate : आता वाहनांमध्ये बसवल्या जाणार टोल प्लेट, मोजावे लागणार इतके पैसे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Toll Plate : भारतात लवकरच सॅटलाईटद्वारे (Satellite) टोलवसूल (Toll) केला जाऊ शकतो. या प्लेटच्या मदतीने सॅटलाईच्या माध्यमातून टोलवसुली करण्याच्या यंत्रणेवर काम सुरू आहे.

ही यंत्रणा लागू झाल्यानंतर फास्टॅगची (Fastag) गरज भासणार नाही. त्याचबरोबर वाहनचालकांची लांबच लांब रांगातून सुटकाही होईल.

भारतात नव्या पद्धतीने टोल आकारला जाईल 

आता भारताचे (India) रस्ते वाहतूक मंत्री भारतातील टोल प्रणाली (Toll system in India) बदलण्यासाठी अनेक पर्यायांवर विचार करत आहेत आणि या सर्व यंत्रणांमध्ये जीपीएस टोल प्रणाली (GPS toll system) आणि नवीन नंबर प्लेटचा समावेश आहे. ही प्रणाली लागू करण्याची चर्चा आहे.

जीपीएस यंत्रणा बसवली जाईल, टोल काढला जाईल

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, सध्या आमच्याकडे टोल वसूल करण्याची यंत्रणा आहे, मात्र आम्ही दोन पर्यायांवर काम करत आहोत. सॅटेलाइट आधारित टोल सिस्टीमचा पर्याय आहे ज्यामध्ये कारमध्ये जीपीएस बसवले जाईल आणि त्यातून टोल कापला जाईल.

नवीन नंबर प्लेट लावली जाऊ शकते

आता नवीन प्रकारची नंबर प्लेट बनवण्याच्या तंत्रज्ञानावर काम सुरू झाले आहे. आता ही नंबर प्लेट लावणे निर्मात्याला बंधनकारक असणार आहे. सर्व जुन्या नंबर प्लेट्सच्या जागी नवीन नंबर प्लेट लावण्यात येईल ज्या नंबर प्लेटमध्ये ऑटो फिट जीपीएस सिस्टम असेल.

नवीन नंबर प्लेटसोबत एक सॉफ्टवेअर जोडले जाईल ज्यातून आपोआप टोल कापला जाईल. हे लक्षात ठेवा की यामुळे लांबलचक रांगांपासून सुटका होईल आणि त्याच वेळी तुम्हाला कामाच्या प्रवासासाठी कमी पैसे द्यावे लागतील. याउलट आजच्या काळात कमी अंतराच्या रस्त्याच्या वापरावर जास्त टोल भरावा लागतो.